water-supply-to-the-city-akola: शहरात 65 एम.एल.डी. प्लांटवरून होणारा पाणी पुरवठा आता चौथ्या दिवशी व इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला महानगरपालिका पाणी पुरवठा योजनेकरीता मुख्य जलस्त्रोत काटेपूर्णा प्रकल्प (महान) असून 12 मार्च 2026 रोजी प्रकल्पामध्ये 39.049 दलघमी एवढा साठा उपलब्ध असून सद्यस्थितीत तापमानात वाढ होत असून शहरामध्ये तिव्र उन्हाळा जाणवत आहे. तसेच वाढते तापमानामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. यामुळे दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठ्यामध्ये लाक्षणिक स्वरुपात घट होत आहे. पाण्याची मागणी आणि होत असलेले वाष्पीभवन लक्षात घेता अकोला महानगरपालिका प्रशसनाव्दारा अकोला शहरात 2 दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा 13 मार्च, 2026 पासून 3 दिवसआड 4 थे दिवशी करण्यात येत आहे. यामुळे 65 MLD प्लांट वरील महाजनी जलकुंभ, मोठी उमरी, गुडधी जलकुंभ, नेहरु पार्क जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी, जलकुंभ, केशव नगर जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगा नगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ वरुन होणारा पाणी पुरवठा 3 दिवसआड 4 थे दिवशी करण्यात येणार असल्याबाबतची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी दिली आहे. तरी शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन मनपा प्रशासनास सहकार्य करावे. 

अकोला शहरातील नागरीकांनी पाण्याची पुरेशी साठवणुक करुन पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, मनपा अकोला यांनी केले आहे. यांची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी आणि मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.



अकोला शहरातील गुंठेवारी व गांवठाण क्षेत्रातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणे बाबत विशेष बैठक संपन्न  


अकोला शहरातील गुंठेवारी व गांवठाण क्षेत्रातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणेकरिता येणा-या अडी-अडचणी दूर करणे संदर्भात महापौर शारदा खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, उपमहापौर अमोल गोगे आणि सभागृह नेता पवन महल्ले यांची मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या समवेत त्यांच्या दालनात विशेष बैठक संपन्न झाली आहे. 

या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या गृह निर्माण विभागतील शासन परिपत्रक 10 मार्च 2026 अन्वये राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत गावठाण क्षेत्रातील व गांवठाण क्षेत्राबाहेरील नागरिकांना योजनेच्या लाभाकरिता पात्र ठरविण्याबाबत सकारात्मक चर्चा संपन्न झाली. 

यामध्ये "गावठाण क्षेत्रातील तसेच गांवठाण क्षेत्राबाहेरील ज्या लाभार्थ्यांकडे जमिनीची मालकी नाही, अशा लाभार्थ्यांना मागील ३ वर्षाच्या मालमत्ता कर पावतीच्या आधारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधकाम (BLC) घटकांतर्गत पात्र ठरवण्यात आले आहे.” 


प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी करताना, योजनेच्या निकषानुसार नगररचना विभागामार्फत घरकुल बांधकाम नकाशा मंजूर करणे अनिवार्य आहे. त्यासाठी लाभार्थ्यांकडे जमिनीच्या मालकी हक्काचे दस्तावेज असणे आवश्यक आहे. मात्र, गावठाण क्षेत्रातील अनेक लाभार्थ्यांकडे मालमत्ता कर पावती व्यतिरिक्त इतर कोणतेही मालकी हक्काचे दस्तऐवज उपलब्ध नाहीत. तसेच अकोला महानगरपालिका क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक स्वतःच्या नांवावर जमीन नसतांनाही अनेक वर्षांपासून गावठाण जमिनीवर वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नावावर जमीन असणे अनिवार्य असल्यामुळे, अशा पात्र व गरजू लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागले असते. 


परंतू सदर परिपत्रकानुसार आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे यानंतर "गावठाण क्षेत्रातील तसेच गांवठाण क्षेत्राबाहेरील ज्या लाभार्थ्यांकडे जमिनीची मालकी नाही, अशा लाभार्थ्यांना मागील ३ वर्षाच्या मालमत्ता कर पावतीच्या आधारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधकाम (BLC) घटकांतर्गत पात्र ठरवण्यात आले आहे.” 


तसेच गुंठेवारी क्षेत्रातील नागरिकांकरिता त्यांचे गुंठेवारी भूखंड नियमानूकुल करणे बाबात प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मनपा आयुक्त यांनी यावेळी संबंधीतांना दिले. अकोला महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर तसेच शासन मालकीच्या जागेवर अतिक्रमण धारकांनासुध्दा त्यांच्या ताब्यात असलेल्या जागेचे मालकी हक्क देऊन प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणेकरिता आवश्यक असलेली प्रक्रिया तातडीने सुरू करणेबाबत निर्देश देण्यात आले. 

या बैठकीत मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार, बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, प्रधानमंत्री आवास योजनेचे श्रीकांत माणिकराव,  शुन्य कंसलटंसीचे मनीष भुतडा आदींची उपस्थिती होती. 



शहरात अस्वच्छता पसरविणा-यांवर मनपा स्वच्छता विभागाव्दारे 18,600/- रूपयांची दंडात्मक कारवाई




शहराची स्वच्छता राख्ण्यासाठी आणि कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका पुर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण क्षेत्रातील झोन निहाय  व्यावसायिक व नागरिकांवर कचरा घंटा गाडीचे वापर न करता परिसरात अस्वच्छता पसरविण्याबाबत मनपा स्वच्छता विभागाव्दारे  एकुण रक्कम 18,600/- रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.


अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी आपल्या घरात व प्रष्ठिानात निघणारा ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून परिसरात किंवा ईतरत्र न टाकता फक्त मनपाच्या कचरा घंटा गाडी मध्येच कचरा टाकून आपले परिसर स्वच्छ ठेवावे असे आवाहन अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा करण्यात येत आहे.   



थकित करापोटी उत्तर झोन येथील मालमत्तांवर अटकावनीची कारवाई   


आज दि. 13 मार्च 2026 रोजी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार आणि सहा.आयुक्त विठ्ठल देवकते यांच्या मार्गदर्शनातअकोला महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर झोन अंतर्गत न्यू तापडिया नगर येथील वार्ड क्र. C-11, मधील मालमत्ता क्रमांक 445  धा. मनोहर कृपलानी व दत्तू पवार यांच्याकडे आज पर्यंत एकूण रक्कम रु. 1,68,275/- मालमत्ता कर थकित असल्याने, तसेच मालमत्ता क्र. 616 धा. विजय भास्करराव देशमुख यांच्याकडे एकूण रक्कम रू. 68,378/- मालमत्ता कर थकित असल्याने, तसेच मालमत्ता क्र. 666 धा. निळकंठ रमेश बोंद्रे यांच्याकडे एकूण रक्कम रू. 61,951/- मालमत्ता कर थकित असल्याने तसेच वार्ड क्रमांक  C-1 मधील मालमत्ता क्र. 1084 यांच्याकडे एकूण रक्कम 149203/- एवढा मालमत्ता कर थकीत असल्याने सदर मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली. 


      

या कारवाईत  सहाय्यक आयुक्त विठ्ठल देवकते, सहाय्यक अधीक्षक पंकज जोगळेकर, वरिष्ठ लिपिक हेमंत शेळवणे, लिपिक योगेश पागृत, संतोष गाडेकर, लिपिक मोहन घाटोळ आदींची उपस्थिती होती.


टिप्पण्या