akola-city-crime-murder-case: दारूच्या नशेत मित्राने केला मित्राचा घात; अवघ्या काही तासात आरोपी टकल्या लागला पोलिसांच्या हाती




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा घात केल्याची घटना अकोल्यात जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री घडली आहे. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली.



जुने शहरातील रमाबाई नगर येथे काल रात्री दोन मित्र नेहमी प्रमाणे सोबत दारू पीत बसले होते. दरम्यान त्यांच्यात बाचाबाची होऊन शिवीगाळ सुरु झाली. हा शाब्दिक वाद हत्याकांड मधे रूपांतरित झाला. एका मित्राने दुसऱ्या मित्राची डोक्यात दगड घालून हत्या केली. 



प्रकाश पंचू जोसेफ आणि पवन विलास मोरे दोघे मित्र एकमेकांच्या शेजारी राहणारे आणि कुठलीही काम सोबत करणारे आणि वेळोवेळी एकत्र बसून दारू पिणारे असे मित्र होते. मात्र प्रकाश दारू पिल्यानंतर पवनला शिवीगाळ करायचा, हे नित्याचेच. शुक्रवारी रात्री नेहमी प्रमाणे दोघेही दारू प्यायले.  आपल्या घरी परतले. मात्र मध्यरात्री  प्रकाश पुन्हा एकदा दारू पिऊन आला आणि दारूच्या नशेत पवनच्या घरासमोर गोंधळ घालून शिवीगाळ करू लागला. ही शिवीगाळ सहन न झाल्याने  पवनचा संयम सुटला, आणि दोघा मित्रांमध्ये वाद झाला. वादातून हाणामारी झाली. दरम्यान पवनने जवळच पडलेला मोठा दगड उचलून प्रकाशच्या डोक्यावर हाणला. प्रकाश रक्ताच्या थारोळात कोसळला आणि  घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. पहाटे पाच वाजताचा सुमारास काही नागरिकानी  मृतदेह पाहतच जुने शहर पोलिसांना माहिती दिली, असा घटनाक्रम समोर येत आहे. घटनेनंतर आरोपी टकल्या उर्फ पवन फरार झाला होता.


दरम्यान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय शहर पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आणि ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. 


टकल्या लागला पोलिसांच्या हाती


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमाबाई नगर जुने शहर येथे एक व्यक्ती मृत अवस्थेत पडलेला आहे, अशा पहाटेच्या दरम्यान मिळालेल्या माहीतीच्या आधारे घटनास्थळी ठाणेदार पो.स्टे. चे अधिकारी, नाईट ऑफिसर तसेच पो. स्टाप असे पोहचुन घटनास्थळाची पाहणी केली.  याठिकाणी एक व्यक्ती मृत अवस्थेत पडलेला असुन अज्ञात व्यक्तीने त्याचे डोकयावर दगडाने मारल्याचे दिसले. यावरून तात्काळ घटनास्थळावरिल सिसिटिव्ही फुटेजवरून, तांत्रीक विश्लेषन तसेच गोपनीय माहीतीचे आधारे अज्ञात आरोपीची ओळख पटवुन गुन्हयातील फरार आरोपी पवन उर्फ टकल्या विलास मोरे (रा. रमाबाई नगर जुने शहर अकोला) याचा शोध घेवुन ताब्यात घेणेकरीता तिन वेगवेगळे पथक तयार करून रवाना करण्यात आले. पो.स्टे. जुने शहरच्या तिनही आरोपी शोध पथकाव्दारे गुन्हयातील आरोपीचा अथक प्रयत्नानंतर वेगवेगळया ठिकाणी शोध घेवुन आरोपी पवन उर्फ टकल्या विलास मोरे (रा. रमाबाई नगर जुने शहर अकोला) यास ताब्यात घेण्यात आले.


कारवाई  पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अजय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन जुने शहर येथील ठाणेदार नितीन लेव्हरकर, सहा.पोलीस निरिक्षक विजय जाधव तसेच रविंद्र करणकार, पोलीस अंमलदार संतोष मेंढे, पंकज उपाध्याय, श्रीकांत पवार, सागर शिरसाट, स्वप्नील पोधाडे, पवन डांबलकर, सुनिल मुळे, गणेश मानकरी, अजय गरकल, पवन बोस, शरद कांबळे यांनी कामगिरी केली.




अकोल्यात अलीकडे दारुपायी हत्याकांड सारखे गंभीर गुन्हे घडत असल्याचे  समोर येत आहे. याला खुलेआम अवैध दारू विक्री कारणीभूत असल्याच्या चर्चा सामान्य नागरीकांमध्ये सुरू आहे.



टिप्पण्या