भारतीय अलंकार न्यूज 24
BAnews24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोट फैल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मस्तान चौकात किरकोळ वादातून प्राणघातक चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अहमद खान शकूर असे मृतकाचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अकोट फैल भागात गुरुवारी उशीरा रात्री किरकोळ वादातून हत्याकांड घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ऑटोरिक्षाचा दुचाकीला लागलेल्या धक्क्यामुळे वाद उफाळून आला. शाब्दिक वाद जबर मारहाणीत रूपांतरीत झाला. यात ऑटोरिक्षा चालक आणि दुचाकीस्वाराने एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले होते.
गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. उपचार दरम्यान एकाचा मृत्यू झाला. अहमद खान शाकूर खान असं मृतकाचे नाव आहे. हा युवक दुचाकीवर पाठीमागे बसला होता.
जखमींची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास अकोट फैल पोलीस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा