- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
accident-murtijapur-highway: मुर्तिजापूर महामार्गावर अपघात: चार पोलीस जखमी; जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या सुरक्षा पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला जामनेर येथून यवतमाळकडे परतत असताना अकोला मुर्तिजापूर महामार्गावर अपघात झाला. त्यात 4 कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचार होत आहेत. यामध्ये जखमी झालेले यामध्ये चालक अनिल ओंकार मडपासे ,SPU युनिट पोलिस कर्मचारी फहीम खान, प्रफुल्ल वाळके, गौतम नाईक या चौघांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत माहिती कळताच मंत्री संजय राठोड यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन जखमीची विचारपूस केली.
मंत्री श्री. राठोड यांना पुढील कार्यक्रमासाठी जामनेर येथे सोडून हे वाहन यवतमाळकडे परतत असताना मुर्तिजापूर महामार्गावर हा अपघात झाला.
त्या चार युवकांची तत्परता
अकोलाहून नागपूरला जाणारे नागपूर पोलिसांचे वाहन बोरगावजवळ टायर फुटल्याने उलटले. या अपघातात चार पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. मात्र दीपक, करण, गौरव, विवेक अपघात झालेल्या ठिकाण जवळच एका ढाब्यावर जेवत होते. अपघात पाहून चारही युवकानी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ उचलले, आणि रुग्णालयात रवाना केले. या संदर्भात या युवकांनी पोलिस विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणत्याही अधिकाऱ्यानी फोन उचलला नसल्याचे युवकांचे म्हणणे आहे. पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने या युवकांनी सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांना तात्काळ माहिती दिल्यानंतर ते त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान मंत्री संजय राठोड यांना या अपघाताची माहिती मिळताच ते अकोल्यात आले. सर्व जखमी पोलिसांची आस्थेने विचारपूस केली.
Akola
jamner
Murtijapur highway
policemen
Road Accident
sanjay rathod
Water Conservation Minister
Yavatmal
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा