undeclared-load-shedding-akl: अघोषित भारनियमन विरोधात आ. पठाण आक्रमक ; तातडीने समस्या सोडविण्याची केली मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : गेल्या काही दिवसांपासून शहरात अवकाळी पावसाचे वातावरण आहे. अशात हवा पाणी आल्यास अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढतच चालला आहे. एकप्रकारे अघोषित लोडशेडींग सुरू होण्याच्या या प्रकाराने नागरिक वेठीस धरल्या जात आहे, परिणामी लवकरात लवकर ही समस्या दूर करावी अन्यथा महावितरण कार्यालयातील वीजपुरवठा खंडित करीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. पठाण यांनी यावेळी अधीक्षक अभियंता अजितपाल दिनोरे यांना दिला. 



आगामी काळात लवकरच मान्सून दाखल होणार आहे. तर मान्सून पूर्व मेंटेनन्स ची कामे सुद्धा महावितरणच्या वतीने सुरू आहे. मात्र वारा, वादळ, पाऊस सुरू झाल्यास अचानक विद्युत पुरवठा खंडित होऊन जातो. तर काही ठिकाणी शहरात सध्या व्होल्टेजची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. तर अनेक परिसरात गोड पाण्याचे नळ येण्याच्या वेळी लाइन बंद होऊन जाते, परिणामी अनेक नागरिकांना पाण्यविनाच राहावे लागते. तर अनेक ठिकाणी रुग्णालय परिसरात सुद्धा अघोषित लोडशेडींग होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर अनेक ठिकाणी मेंटेनन्सच्या नावाखाली अघोषित भारनियमन केले जाते. किमान मेंटेनन्स करण्यापूर्वी त्या परिसरातील नागरिकांना कळायला पाहिजे की तेथे विद्युत पुरवठा का खंडित करण्यात आला, अशा सूचना महावितरणच्या कार्यालयाकडून करण्यात यावे. सोबतच स्थानिक स्तरावर तक्रार नोंदविण्याची यंत्रणा उभारावी अशी सूचना सुद्धा यावेळी आ. पठाण यांनी दिली. हे सर्व प्रश्न माझ्या एका मतदारसंघापुरते मर्यादित नसून संपूर्ण शहराचा आहे. लवकरच ही अडचण सोडवावी अन्यथा आगामी काळात महावितरणच्या कार्यालयाची वीज बंद करून अधिकाऱ्यांना अघोषित लोडशेडींग काय असते ते दाखविणार असा तीव्र इशारा यावेळी आ. पठाण यांनी दिला. 



यावेळी मोहम्मद इरफान, डॉ. प्रशांत वानखडे, आकाश कवडे, जावेद जकारिया, महेंद्र गवई, सोहेल खान, रवी शिंदे, मोईन खान, कपिल रावदेव, मेहमूद खान आदी उपस्थित होते. 

तर युसुफ खान, अंकुश तायडे, मोहम्मद शारिक, राहुल सारवान, अभिजीत तवर, शेख अर्शद, साहिल शहा, सलीम अली, सोनू साहेब, प्रशांत प्रधान, तशवर पटेल, आसिफ खान, सोहेल खान पठाण, जिम्मी पठाण, अन्सार पठाण,  मुजमील शेख( एम. एस) यांच्यासह शेकडो नागरिक महावितरण कार्यालयाबाहेर उपस्थित होते. 





पश्चिम विधानसभा मतदारसंघात विशेष भारनियमन 


गेल्या दहा दिवसांपासून पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघात विनाकारण विजेचा लपंडाव सुरू आहे. हा कोण्या भाजपाच्या लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर जर आपण करत असाल तर याद राखा एक लोकप्रतिनिधी काय असतो हे आपल्याला दिसून जाणार. लवकरात लवकर हा विजेचा खेळ बंद करा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा असा सज्जड दम आ. पठाण यांनी यावेळी दिला.

टिप्पण्या