road-accident-mothi-umari-akl-: बँड पार्टीचा टेम्पो आणि दुचाकीत जोरदार टक्कर; दोन युवक गंभीर जखमी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: दोन दिवसांपूर्वी उड्डाणपुलावर झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच शहरातील मोठ्या उमरी परिसरात शिव मंदिराजवळ रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. श्री संत गुलाब बाबा बँड पार्टीचा 407 टेम्पो गाडी आणि एका दुचाकीत जोरदार धडक होवून, यामध्ये दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. युवकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



प्राप्त माहितीनुसार बँड पार्टी एका ठिकाणचा कार्यक्रम आटोपून 407 गाडीने (MH 30 L 2093) टॉवर चौकाच्या दिशेने जात होती. यावेळी समोरच्या दिशेने आलेली दुचाकी (MH 28 AH 5826) व 407 टेम्पोगाडी यांच्यात  जोरात टक्कर झाली. 


या अपघातात दुचाकीस्वार दोघेही खाली आपटले. प्रवीण वानखडे आणि आनंद जंजाळ असे जखमींचे नाव असल्याचे कळते. यात दोघेही गंभीर जखमी झाले. तर बँड पार्टीची गाडी क्षतिग्रस्त झाली असून, आर्थिक नुकसान झाले आहे.



अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  




या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहे. 



टिप्पण्या