भारतीय अलंकार न्यूज 24
अखेर भारतानं पाकिस्तान मध्ये घुसून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सरकार आणि भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख अधिकारी यांच्यात मॅरेथॉन बैठक सुरू होत्या. मात्र भारत काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं होतं. अखेर भारताकडून आज बुधवारी पहलगाम हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करून उध्वस्त केले आहेत.
भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे, ज्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात लक्ष्य करण्यात आले, जिथून दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि निर्देश केले जात होते.
भारतीय वायुसेनेकडून बुधवार 7 मे रोजी रात्री पावणेदोनच्या सुमारास 'ऑपरेशन सिंदूर' सुरु करण्यात आले. या हल्ल्याबाबत संरक्षणखात्याकडून माहिती देण्यात आली आहे. काही वेळापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. ज्याठिकाणाहून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचं प्लॅनिंग केले जात होते.
भारताने स्ट्राइकची घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच, भारतीय लष्कराने ट्विटरवर पोस्ट केले, "न्याय झाला. जय हिंद."
भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांनी पाकिस्तानी हद्दीत मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमधील अहमद पूर्व भागात तीन ठिकाणी लक्ष्य केले असल्याचे समोर येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा