ips-archit-chandak-sp-akola-: अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक; बच्चन सिंह यांची नागपूरला बदली




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन आदेशान्वये भा.पो.से. अधिकारी यांच्या बदलीचे आदेश आज 22 मे रोजी सायंकाळी येवून धडकले आहेत. यामध्ये अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांची देखील बदली झाली असून, त्यांच्या जागी अकोल्याला अर्चित चांडक हे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला जिल्ह्याला लाभले आहेत.


अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची बदली नागपूर येथे झाली असून, समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. ४, नागपूर हे पद ते सांभाळणार आहेत. तर नागपूर शहर पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक यांना अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे नागपूरचे मूळ रहिवासी असून  त्यांचे शालेय शिक्षण नागपुरातच झाले. अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांनी दिल्ली गाठले. अर्चित चांडक हे 2012 च्या जेईई परीक्षेतही टॉपर राहिले आहेत. दरम्यान त्यांनी विदेशातील 35 लाख पॅकेजची नोकरी नाकारून देशसेवेचे व्रत स्वीकारत आयपीएसची तयारी सुरू केली.


अर्चित चांडक यांनी नोकरी नाकारल्या नंतर 2016 मध्ये नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांनी 2018 मध्ये यूपीएससी परीक्षा दिली आणि ऑल इंडिया रैंक (एआयआर) 184 मिळविली.


क्रीडा क्षेत्रात उच्चतम कामगिरी


अर्चित चांडक यांना बुद्धिबळ खेळाची विशेष आवड आहे. त्यांचे FIDE रेटिंग 1,820 आहे. यासोबतच ते त्यांच्या फिटनेसचीही काळजी घेतात. त्यांनी 42 कि.मी. मुंबई मॅरेथॉन पूर्ण केली आहे. अर्चित चांडक हे सोशल मीडियावर  देखील सक्रिय असतात. त्यांचे हजारो फॉलोवर्स आहेत. 







टिप्पण्या