akl-junction-navjeevan-express: धावत्या नवजीवन एक्सप्रेस समोर युवकाने स्वतःला दिले झोकून ; रेल्वे सेवा काही वेळ प्रभावित, अकोला जंक्शन वरील घटना



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक दोन जवळ चेन्नईकडे जाणाऱ्या धावत्या नवजीवन एक्सप्रेस गाडीसमोर एका युवकाने उडी मारल्याची घटना आज सकाळी घडली. यामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला. 


प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने अचानक रेल्वे गाडीच्या समोर उडी मारली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 


या घटनेमुळे रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ माजली होती. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही, पण स्थानिक प्रशासन या घटनेच्या तपासामध्ये लागले आहे. 



या प्रकारामुळे रेल्वे सेवेवर काही वेळ प्रभाव झाला होता, परंतु नंतरच्या काळात सर्व सुरळीत झाले. 




अकोला रेल्वे जंक्शनवर चेन्नईकडे जाणाऱ्या नवजीवन एक्सप्रेससमोर एका अंदाजे 26 वर्षीय अज्ञात युवकाने उडी घेतली. ही घटना आज सकाळी सुमारे 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास घडली. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून नवजीवन एक्सप्रेस जात असताना, अचानक त्या युवकाने स्वतःला धावत्या रेल्वेखाली झोकून दिले. या प्रकाराचा संपूर्ण थरार स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.



घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि Government Railway Police (GRP) चे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवला. सध्या मृत युवकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून, घटने मागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 




मृत युवकाचे छायाचित्र वरून कुणास ओळख पटत असल्यास संबंधितांनी अकोला रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा.



दरम्यान, हा युवक ट्रेन 100 मीटरच्या अंतरावर असताना ट्रॅकवर गेला असल्याचे समजते. यामुळे या ठिकाणी रेल्वे पोलिसांची गस्त नव्हती का, असा प्रश्न या घटनेनंतर आता उपस्थित होत आहे.

टिप्पण्या