vikram-kate-pass-medical-akl: डॉ. विक्रम काटे युनायटेड स्टेट मेडिकल लायसन्स परीक्षा 99.9 टक्क्यांनी उत्तीर्ण




ठळक मुद्दे


अमेरिकेच्या विद्यापीठात मिळवला थेट प्रवेश


अकोल्याच्या वैभवात रोवला मानाचा तुरा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : स्थानिक तापडिया नगर येथील रहिवासी डॉ.विक्रम प्रीति राजेश काटे याने वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात कठीण मानली जाणारी युनायटेड स्टेट मेडिकल लायन्ससिंग एक्झाम ९९.९ टक्क्यांनी उत्तीर्ण करून अकोल्याच्या वैभवात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या नेत्रदीपक यशामुळे डॉ.विक्रमला अमेरीकेच्या ख्यातनाम विद्यापीठात थेट प्रवेश मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



     

डॉ.विक्रम हा स्थानिक निदान पॅथॉलॉजी  व आयकॉन हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.राजेश काटे आणि महाराष्ट्र शासनाच्या कामगार विमा योजनेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रीति काटे यांचा सुपुत्र आहे .त्याने अमेरिकेतून घेण्यात येणारी युनायटेड स्टेट मेडिकल लायन्ससीग एक्झामची भारतातून तयारी केली. 



या परीक्षेकरिता जगभरातून विद्यार्थी प्रयत्नरत असतात. ही परीक्षा  तीन टप्प्यात घेण्यात येते. यातील दोन परीक्षा त्याने भारतातून तर तिसरी परीक्षा अमेरिकेत जावून दिली. यासाठी साधारणपणे तीन ते चार वर्ष लागतात. मात्र विक्रमने आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर एका वर्षात या परीक्षा उत्तीर्ण करून दाखवल्या आहेत. ज्यामुळे त्याच्यासाठी अमेरिकेतील यू.ए.एम.एस. अरकॅन्सास विद्यापीठाने इंटर्नल मेडिसीन विषयाचे कवाडे खुली केली आहे. या यशामुळे तो भविष्यात जगामध्ये कुठेही डॉक्टरीचा व्यवसाय करू शकणार आहे.



दरम्यान, डॉ.विक्रम हा वर्ष २०१७ मध्ये नीटच्या परीक्षेत महाराष्ट्रातून पहिला तर भारतातून सातवा आला होता.मुंबई येथील केइएम विद्यापीठात एमबीबीएसचे शिक्षण त्याने पूर्ण केले असून, या शिक्षणाच्या अंतिम वर्षात त्याने मेहनतीच्या बळावर हे यश प्राप्त केले आहे. इंडियन नॅशनल बायोलॉजी ‌‌ॲलिम्पीयाडमध्येही डॉ.विक्रम काटेने घवघवीत यश संपादीत केले होते.३ लाख विद्यार्थ्यामधून केवळ ३० विद्यार्थ्यांची निवड झाली होती. राज्यातून तो एकमेव निवडला गेला होता, हे येथे उल्लेखनीय आहे. त्यामुळे डॉ.विक्रमची आंतरराष्ट्रीय  शिबिरासाठी निवड झाली होती. कुशाग्र बुध्दीच्या डॉ. विक्रमने केवळ काटे परीवारचेच नव्हे तर अकोल्याच्या वैभवातही भर टाकली आहे. डॉ.विक्रमच्य नेत्रदीपक यशाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

टिप्पण्या