भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : सिक्कीम येथे जोरदार पावसामुळे झालेल्या भुस्खलन मध्ये अकोला, पुणे आणि नागपूर येथील सुमारे १०० हून अधिक पर्यटक अडकले होते. यामध्ये अकोल्यातील १६ पर्यटकांचाही समावेश होता. अकोल्यातील हे प्रवासी सिक्कीमच्या लाचून येथे पोहोचले असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हे सर्व प्रवासी आता परतीच्या प्रवासावर निघाले असल्याचे वृत्त आहे. हे सर्व प्रवासी दोन दिवस सिक्कीम येथे अडकलेले होते.
ईशान्य भारतातील उत्तर सिक्कीममध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या संख्येने पर्यटक अडकले आहेत. चुंगथांगमध्ये भूस्खलन-मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सुमारे १००० पर्यटक आणि २०० वाहने अडकल्याची माहिती आहे. अडकलेल्या पर्यटकांसाठी युद्धस्तरावर मदत कार्य सुरू असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नागपूर आणि अकोला येथील पर्यटकांचा समावेश आहे. तर अकोल्यातील १६ प्रवासी हे सुखरूप असून अकोलाकडे निघाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अकोल्यातील Dr Sanjay Shinde,Dr Prashant Barapatre,Dr Prabhakar jaybhaye, आणि Dr Sital Tongse हे त्यांचे कुटुंबीयांसह सिक्कीम येथे पर्यटनास गेले होते. लाचूंग हे ठिकाण सिक्कीममधील मंगन जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले अकोल्यातील 16 जण अडकले होते. दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून देखील सिक्कीम राज्यातील सरकार आणि प्रशासनाशी संपर्क करून पर्यटकांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
काश्मीर येथे गेलेले ३१ पर्यटक अकोल्यात पोहचले
दरम्यान, काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवाद्यांच्या हल्ल्या नंतर श्रीनगर येथे अडकलेले अकोल्यातील ३१ पर्यटक सुखरुप परतले आहेत. पहलगाम मध्ये अतिरेकी हल्ल्यामुळे हे सर्व पर्यटक अडकले होते .केंद्र , राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने या पर्यटकांना सुरक्षितरित्या त्यांच्या गावी परतण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवारी हे सर्व पर्यटक मुंबई येथे पोहचले होते. यानंतर शनिवारी सकाळी स्पेशल बस द्वारे त्यांना अकोल्यात आणण्यात आलं. यावेळी पर्यटकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाचे आभार मानले. त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने वेळोवेळी योग्य निर्णय घेतले आणि त्यांना आवश्यक मदत पुरवली. यावेळी आपल्या कुटुंबीयांना पाहता या पर्यटकांचे डोळे भरून आले. तर काश्मीर येथील प्रशासनाने आणि नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं असल्याचं पर्यटकांनी म्हटले आहे.
यावेळी सर्व पर्यटकांचे आमदार रणधीर सावरकर भाजप नेते विजय अग्रवाल आदींनी स्वागत केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा