- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-crime-news-city-kotwali: सौभाग्याचे साहित्य विक्रेत्यांनी विवाहितेच्या जीवनात आणले दुर्भाग्य; सिटी कोतवाली पासून हाकेच्या अंतरावरील ‘परी बिंदी घर’ मधील गैरधंदे उघड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दोन आरोपीस पी सी आर
एक आरोपी रुग्णालयात उपचारार्थ भरती
चौघांवर गुन्हे दाखल
एकाला अटक होण्याची प्रक्रिया सुरू
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : स्थानिक सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ' परी बिंदी घर ' दुकान संचालक व त्याच्या साथीदारांकडून डाबकी रोड येथील रहिवासी असलेल्या एका विवाहित महिलेला तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून सदर युवतीला धर्मांतर करण्याचा दबाव आणल्या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
सदर बिंदी घर मध्ये महिलांचे साज शृंगार आणि सौभाग्याचे साहित्याची विक्री केल्या जाते. अर्थातच येथे महिला ग्राहक दररोज मोठ्यासंख्येने खरेदी साठी येतात. अश्यावेळी दुकानात नवीन वस्तू आल्यास महिलांसोबत संपर्क साधण्यासाठी महिलांना मोबाइल क्रमांक हे विक्रेते विचारत असतं. आणि नंतर त्यांच्याशी संपर्क साधून ओळख वाढवायचे. अश्या प्रकारे अनेक महिला आरोपींच्या संपर्कात येत होत्या. या महिलांसोबत अंगलट करुन त्याचे महिलांच्या नकळत चित्रीकरण केल्या जात होते. महिला आरोपींच्या एकदा का जाळ्यात अडकली की, तिला धर्म बदलण्याची सक्ती केल्या जात असे. जर महिलेने विरोध केला तर व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याच्या धमकी देत असल्याची माहिती समोर येत आहे.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दिनांक ०२/०२/२०२६ रोजी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे पिडीत महीलेच्या रीपोर्ट वरून गुन्हा नोंद क. ९२/२०२६ कलम ७७, ७५ (१), (३), ७६, ६४,३ (५) बी.एन.एस. अन्वये नोंद करण्यात आला आहे.
दोघांना अटक
सदर गुन्हयामध्ये एकुण ४ आरोपी असुन आरोपी मोहम्मद आसिफ उर्फ बाबु मोहम्मद सलीम तेली, चंदु वानखडे यांना गुन्हयात अटक करण्यात आली असुन न्यायालयाने त्यांचा ०७ फेब्रुवारी २०२६ पावेतो पी.सी.आर. मंजुर केलेला आहे. व इमरान खान यासीन खान उर्फ गॅरेजवाला यास ताब्यात घेवुन अटकेची कारवाई सुरू आहे. तसेच आरोपी रहेमान उर्फ मोहम्मद मुस्तफा मोहम्मद सलीम तेली हा गुन्हा दाखल होण्यापुर्वी पासुन त्याची तब्येत ठीक नसल्याने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे उपचार घेत आहे. वैदयकीय अधिकारी यांनी त्यास डिस्चार्ज दिल्यानंतर त्याची अटकेची कारवाई करणेबाबत तजबीज ठेवली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील व पोलीस निरीक्षक संजय गवई यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत.
या प्रकरणी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये, असे आवाहन अकोला पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
akola city
akola crime
akola news
breaking news
city kotwali
crime news
maharashtra news
police station
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा