shri-ram-navami-shobhayatra: 40 वर्षाची समृध्द परंपरा: श्रीराम नवमी शोभायात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा - विश्व हिंदू परिषद श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे आवाहन





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी जागरणाकरीता वर्ष 1986 ला संपूर्ण देशभरात विश्व हिंदु परिषदेच्या माध्यमातून श्रीराम नवमी शोभा यात्रा काढण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून राजराजेश्वर महाराजांच्या अकोला महानगरीत सुध्दा शोभायात्रा सुरू करण्यात आली होती. विश्वहिंदू परिषदेच्या संकल्पनेने व दिवंगत आमदार स्व. श्री. गोवर्धन शर्मा यांच्या प्रयत्नाने या शोभायात्रेला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त करून दिले व ही शोभायात्रा संपूर्ण विदर्भातील सर्वातमोठी शोभायात्रा म्हणून प्रसिध्द झाली. सर्व समाजाला सोबत घेवून प्रभू श्रीरामजी सारखेच समरसतेचा संदेश या शोभायात्रेव्दारे आ.स्व. गोवर्धन शर्मा यांनी प्रस्थापित केला. यंदाची शोभायात्रा 6 एप्रिल रोजी साजरी होणार आहे व समृध्द सांस्कृतिक वारशाचा गौरव करणारी व समाजात सकारात्मकता उत्साहाचा संचार होणार आहे. यंदाच्या शोभायात्रेत तब्बल 51 विविध देखावे, (झाँकीया) सादर केली जाणार आहे.


 



40 वर्षापूर्वी सुरू झालेल्या या शोभायात्रेला शहरातील महत्वाचे महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील पंचक्रोषितील अनेक रामभक्त या उत्सवात उपस्थित होतात. 


कालिया मर्दन देखावा



भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीत राहणाऱ्या विषारी कालिया नागाला शांत करून त्याच्या डोक्यावर नाचून त्याला त्याच्या समुहामध्ये जाण्यास सांगितले आणि कालियाने ते मान्य केले, असा श्रीकृष्णाच्या पराक्रमाचा आणि वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीच्या विजयाचा प्रतिक असलेला देखावा विश्व हिंदू परिषद श्रीराम नवमी शोभायात्रा समितीव्दारे यंदा सिटी कोतवाली चौकात महाराणा प्रताप बागेच्या समोर साकारला आहे. भगवान श्रीकृष्ण व कालीयाँ मर्दान नागाचे भव्य चलचित्र देखावाचे (झाँकी) आयोजक गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटीडे आहेत. त्यासह कपडा बाजार चौकात सुध्दा धार्मिक देखावा (झाँकी) साकारण्यात आले. हे देखावे पाहण्यासाठी बच्चे कंपनीसह महिला व पुरुष गर्दी करीत आहेत.




या शोभायात्रेचे स्वरूप संपूर्णतः धार्मिक व पारंपारीक पध्दतीचे असून शोभायात्रे मध्ये धर्मध्वजासह 11 घोडेस्वार सहभागी होणार आहे. यात बालशिवाजी, जिजामाता, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी ताराबाई, छत्रपती संभाजी महाराज व अन्य महापुरूषांचे घोड्यांवर झाँकी सादर करण्यात येणार आहे. तसेच श्रीराम पादुका सह विश्वहिंदू परिषदेचा मानाचा श्रीराम दरबार राहणार आहे. धार्मिक तत्वावर 51 विविध धार्मिक झाँकिया सह 50 महिला दिंडी मंडळ, भजनी मंडळ, 10 पुरूष वारकरी संप्रदाय दिंडी मंडळ, ढोल पथक इत्यादींचा समावेश आहे. सर्व झाँकी धार्मिक स्वरूपाच्या असुन सर्व संप्रदायाच्या राहणार आहेत. 



रविवार 6 एप्रिल रोजी आयोजित ही श्रीराम नवमी शोभा यात्रा सायंकाळी 5 वाजता आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरात पादुका पुजन करून शोभायात्रेची सुरूवात होणार आहेत. शहरातील अनेक मान्यवर, राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील गणमान्य नागरीक यावेळी उपस्थित राहणार आहेत. 




शोभायात्रेमध्ये सर्व महिला पुरूषांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम नवमी शोभा यात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा यांच्या सह श्रीराम नवमी शोभा यात्रा समितीचे अध्यक्ष शैलेन्द्र उर्फ (बंटी) कागलीवाल, विश्वहिंदु परिषदेचे महानगर अध्यक्ष प्रकाश लोढीया, समितीचे कोषाध्यक्ष राहूल राठी, विश्वहिंदू परिषदेचे प्रांतमंत्री गणेश काळकर, बजरंगदल प्रांत सहसयोजंक सुरज भगेवार यांनी केले आहे. 




समितीचे माजी अध्यक्ष विलास अनासाने, रामप्रकाश मिश्रा, डॉ. अभय जैन, शैलेष खरोटे सह प्रकाश घोगलिया, विभाग संयोजक हरिओम पांडे, विभागमंत्री संजय दुबे, जिल्हामंत्री निलेश पाठक, बाळकृष्ण बिडवई, कोषाध्यक्ष अमर कुकरेजा, उपाध्यक्ष राजू मंजूळकर, अशोक गुप्ता, वसंत बाछुका, सिध्दार्थ शर्मा, नविन गुप्ता, मनिष बाछुका, संदिप वाणी, संदिप निकम, रोशन जैन, विजय दहाटे, प्रताप विरवाणी, आकाश ठाकरे, नितीन जोशी, अरूण शर्मा, डॉ. प्रियेश शर्मा, संतोष बोर्डे, निलेश नागोसे, मनोज कस्तुरकर, संतोष पांडे, विक्की ठाकुर, सुनिल कोरडीया, अक्षय गंगाखेडकर,  गंगादेवी शर्मा, अर्चना शर्मा, कल्पना कागलीवाल, मिना कागलीवाल, पुष्पा वानखडे, आरती शर्मा, ज्योती टोपरे, मनिषा भुसारी, रेखा नालट, सारीका देशमुख, चित्रा बापट, छाया तोडसाम, चंदा ठाकुर, कल्पना अडचुले, सुमन गावंडे, मालती रणपिसे, सुरेख नवापुरे, संतोष शर्मा, आरती घोगलीया, अलका देशमुख, वसुधा बिडवई आदी पदाधिकारी शोभायात्रा यशस्वीतेकरिता परिश्रम घेत आहेत.


                   जय श्रीराम

टिप्पण्या