nationalist-congress-party-akl: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आश्वासक चेहरा; अखेर मो.बद्रूजमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब, अकोला जिल्हाध्यक्ष पदाबाबत संभ्रम मिटला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हाध्यक्षपदी मोहम्मद बद्रूजमा यांची नियुक्ती


Mohammad Badruzma appointed as Akola District President of Nationalist Congress Party



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी अकोट येथील माजी नगरसेवक मोहम्मद बद्रूजमा यांची नियुक्ती केली आहे.  


पक्षाध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेने व आमदार अमोल मिटकरी यांच्या पुढाकाराने ही नियुक्ती करण्यात आली असून, यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार संजय खोडके, आमदार कायंदे, माजी महिला प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, अमरावती ग्रामीण अध्यक्ष संतोष महात्मे, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष वसंत घुईखेडकर आदि नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. 


गेल्या वर्षभरापासून अकोला जिल्हाध्यक्ष पदाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु विधान परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आमदार अमोल मिटकरी यांच्या यशस्वी शिष्टाईने अजित पवार यांनी या पदाकरिता मोहम्मद बदरुजमा यांच्या नावाला पसंती दिली. 


मोहम्मद बद्रूजमा हे पूर्वाश्रमीचे बाबा सिद्दिकी यांचे निकटवर्तीय म्हणून राज्यभर परिचित आहेत. याआधी त्यांनी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचे संचालक पद सुद्धा भूषवलेले आहे. तसेच कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले आहे. अकोट नगर परिषदेमध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून सुद्धा आले होते. अकोला जिल्ह्यामध्ये पूर्वी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदावर सुद्धा त्यांनी सक्रियपणे कार्य केले असून त्यांचा जिल्ह्यामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. राष्ट्रवादीने या ठिकाणी नवीन आश्वासक चेहरा दिल्याने आगामी काळामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिका व नगरपरिषद या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटन शक्ती भक्कम होईल, असा आशावाद राष्ट्रवादीच्या पदाधिकारांमुळे निर्माण झाला आहे.

टिप्पण्या