JEE-Main-2025-exam-akola: अकोल्यातील 30 विद्यार्थ्यांची JEE मेन 2025 परिक्षेत उत्तुंग कामगिरी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : देशभरातील परीक्षापूर्व तयारीसाठी घेण्यात येणाऱ्या JEE main 2025 दुसऱ्या सत्राचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. यात उल्लेखनीय बाब म्हणजे अकोला शाखेतील 30 विद्यार्थ्यांनी JEE मेन 2025 दुसऱ्या सत्रात 92.76 पेक्षा  अधिक गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे ही सर्वचेंसर्व सर्व विद्यार्थी आकाश एज्युकेशन चे विद्यार्थी आहेत.


परिक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये , साई इंगळे – 99.83 टक्केवारी, सोहम शंकर चव्हाण – 99.49 टक्केवारी, जियान अतर पांडे – 99.29 टक्केवारी, आर्या भाकरे – 98.43 टक्केवारी, आदित्य अनिल भीवगडे – 97.95 टक्केवारी, शहनवाज मेमन 97.64 टक्केवारी या विद्यार्थ्यांच्या समावेश आहे.


भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षांपैकी एक असलेल्या JEE मध्ये त्यांनी ही उज्वल यश संपादन केली आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (NTA) हे निकाल जाहीर केले असून यंदाच्या वर्षासाठी नियोजित दुसरे आणि अंतिम सत्र संपल्याची घोषणा केली आहे.


याबाबत डॉ. एच. आर. राव म्हणाले की, “आमच्या विद्यार्थ्यांनी JEE मेन 2025 मध्ये मिळवलेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. योग्य मार्गदर्शन, चिकाटी आणि परिश्रम यांच्या साहाय्याने त्यांनी हे यश मिळवले. आकाशमध्ये आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देतो, जे विद्यार्थ्यांना त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यात मदत करते " तसेच राव यांनी यावेळी  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


JEE (मेन) ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअर सुधारण्याचे अनेक संधी मिळाव्यात. JEE अ‍ॅडव्हान्स्ड ही परीक्षा केवळ IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते, तर JEE मेन ही भारतातील अनेक NIT आणि अन्य केंद्रीय सहाय्यित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गेटवे म्हणून काम करते. JEE अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्र होण्यासाठी JEE मेन देणे आवश्यक आहे.

टिप्पण्या