- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: हिंदू ज्ञानपीठ अकोला नागपूरच्या संचालिका व ज्येष्ठ प्राचार्या तसेच स्वर्गीय धर्मवीर चंद्रशेखर गाडगीळ यांच्या पत्नी गिरीजाताई गाडगीळ यांचे आज 3 एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्या 83 वर्षांच्या होत्या.
file image
त्यांचे पश्चात पुत्र एडवोकेट संग्राम, सून, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी सिंधी कॅम्प स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अखेरचा वंदे मातरम् ||
बडी दीदी... भावपूर्ण श्रद्धांजलि
शिस्त, आदर, प्रेम, करुणा, तत्व आणि माया यांचा असा अंश पुन्हा होणे नाही.
आदर्श आणि तत्ववादी अशा अविरत पिढ्या घडवणारे व्यक्तिमत्व आज अनंतात विलीन झाले. त्यांना अखेरचा
वंदे मातरम् ||
हिंदू ज्ञानपीठातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनावर भारतीय संस्कृती, परंपरा, यांचे संस्कार बिंबविणाऱ्या, सर्वांवर मातेप्रमाणे प्रेम करणाऱ्या, मातृशक्ती पुरस्कारासह अनेक पुरस्काराने सन्मानित हिंदू ज्ञानपीठाच्या आधारस्तंभ असलेल्या आमच्या लाडक्या आदरणीय ज्येष्ठ प्राचार्या गिरिजा चंद्रशेखर गाडगीळ आमच्या सर्वांच्या आदरणीय बडी दीदी यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली
अश्या शब्दात बडी दीदी यांना लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
भावपूर्ण श्रद्धांजली
भारतीय अलंकार न्यूज 24 परिवार तर्फे श्रीमती गिरिजाताई चंद्रशेखर गाडगीळ (बडी दीदी) यांना भावपूर्ण श्रद्धांजली
ॲड. नीलिमा शिंगणे जगड,
मुख्य संपादक
भारतीय अलंकार न्यूज 24
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा