- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : गोमय स्नान ही एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. जी मुख्यतः हिंदू धर्माशी संबंधित आहे. याला 'गोबर स्नान' असेही म्हंटले जाते.
अकोल्यातील म्हैसपुर येथील आदर्श गोशाळा येथे हे गोमय स्नान शनिवारी महिलांसाठी आणि रविवारी पुरुषांसाठी विशेषतः उन्हाळ्यात निःशुल्क आयोजित केल्या जाते.
या गोशाळेत सुमारे चौदाशे गायींचे संगोपन केले जाते. गोमय म्हणजे गायच्या शेणाचं आणि गोमूत्रचा मिश्रण वापरून केलेलं स्नान शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धतेसाठी महत्त्वाचं मानलं जातं.
गोमय स्नानाची पध्दत
शेणाला गोमुत्रात मिसळून त्याचा लेप बनवला जातो आणि तो संपूर्ण शरीरावर लावला जातो. या क्रियेमध्ये गायीच्या शेणाच्या औषधीय गुणांचा उपयोग होतो. ज्यामुळे उन्हा पासून बचाव आणि विविध आजारांवर उपचार होण्यास मदत मिळते.
“लोकांचा विश्वास आहे की गोमय स्नानामुळे शुद्धता मिळते, आणि हे प्रकृतीसह समृद्धतेची भावना जागवते. सणसमारंभांमध्ये या स्नानचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. जे लोकांमध्ये एकत्र येण्याचे, सामूहिक स्नेह परिपूर्ण करण्याचे आणि समाजातील मूल्यांची जपणूक करण्याचे कार्य करते. अशा प्रकारे गोमय स्नानाच्या परंपरेमुळे समाजात एकता, प्रामाणिकपणा आणि धार्मिक भावना जोपासली जातात.”
रमाकांत भोपळे , गौरक्षक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा