deven-bharti-mumbai-police: देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती

 संग्रहित छायाचित्र 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे मुंबईच्या आयुक्तपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर यावरून पडदा उठला असून आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची आज बुधवार 30 एप्रिल रोजी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त म्हणून काम केलेले आहे. शिवाय गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त, उपायुक्त म्हणून त्यांनी काम केलेले आहे. काही काळासाठी ते आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुखदेखील होते. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. महायुती सरकार आल्यानंतर विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती करण्यात आली होती. देवेन भारती यांना मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त बनण्याचा मान मिळाला होता. आता विवेक फणसळकर निवृत्त झाल्यानंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.



सुरुवातीच्या काळात देवेन भारती यांनी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून देखील यशस्वी कारकीर्द पार पाडली आहे. ते उत्तम क्रिकेट खेळाडू देखील आहेत.




टिप्पण्या