wine-and-beer-bar-close-akola: अवाजवी टॅक्स व फी वाढ निषेधार्थ उद्या अकोला जिल्ह्यातील वाईन व बिअर बार बंद

file image



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शासनाकडून परमिट रूम मधील मद्य विक्रीवर 10 % व्हॅट टॅक्स मध्ये वाढ व 2025 -26 नूतनीकरण फी मध्ये 15% वाढ केल्यामुळे  दोन्ही निर्णयामुळे अनुद्यप्तीधारक यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. 




हे अवाजवी अन्यायकारक टॅक्स व फी वाढ रद्द व्हावी, यासाठी अकोला जिल्हा वाईन बार व बिअर बार असोसिएशन, फेडरेशन ऑफ हॉटेल असोसिएशन, महाराष्ट्र यांनी गुरुवार 20 मार्च 2025 रोजी निषेध करीता बंद पुकारला आहे.



अवाजवी फी वाढ, 10 टक्के व्हॅट टॅक्सला निषेध करीता  20 मार्चला पूर्ण दिवस परमिट रूम बंद ठेवण्याचा  निर्णयाला अकोला जिल्यातील बहुतांशी परमिट रूम धारकांनी असोसिएशनला होकार कळविला आहे. 




परमिट रूम धारकांच्या होकाराने अकोला जिल्हा वाईन बार व बियर बार  अससिएशनच्या तर्फे उद्या 20  मार्च रोजी बंद पुकारून फेडरेशन ऑफ होटेल असोसिएशन, महाराष्ट्र यांना समर्थन व पाठिंबा जाहीर करीत असल्याचे अकोला जिल्हा वाईन बार व बिअर बार असोसिएशनचे अतुल पवनीकर यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या