भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अयोध्येत रामनवमीला अकोला येथे तयार करण्यात आलेल्या रजगिराच्या लाडूचे वाटप करण्यात येणार आहे. 6 एप्रिलला अयोध्येत रामनवमीला 1 लाख राजगिराचे लाडू अकोल्यातील अभ्यंकर परिवाराला वाटपाचा मान मिळाला आहे. मागील वर्षी अभ्यंकर परिवाराने अयोध्येत 1 लाख लाडू वाटपाचा संकल्प घेतला होता. लाडू वाटपा संदर्भात अभ्यंकर परिवाराने आयोध्या राम मंदिर ट्रस्टला पूर्व परवानगी मागितली होती आणि ट्रस्ट तर्फे त्यांना लाडू वाटपाची परवानगी देण्यात आली आहे. हे लाडू आयोध्येत राम भक्तांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.
सध्या अकोल्यात त्यांची 1 लाख राजगिराचे लाडू तयार करण्यासाठी तयारी सुरू आहे. या उपक्रमासाठी त्यांना त्यांच्या परिवाराची आणि अकोलेकरांची मोठी मदत मिळत आहे.
अभ्यंकर परिवाराला मिळालेल्या या मान मुळे अकोल्याच नाव सुद्धा उंचावल आहे.
“दिवस रात्र लाडू तयार करण्याचे कार्य सुरू असून 2 एप्रिलला हे संपूर्ण लाडू ट्रक द्वारे अयोध्येला पाठवण्यात येणार आहे. हे लाडू तयार करण्यासाठी 500 किलो गूळ आणि 500 किलो राजगिरा लाहीचा वापर करण्यात आला आहे.”
-सुधीर अभ्यंकर
अकोला
शोभायात्रा समिती तर्फे सत्कार
अभ्यंकर परिवाराला मिळालेल्या या बहुमनाबद्दल आज विश्व हिंदू परिषद श्रीराम नवमी शोभायात्रा समिती अकोलाच्या वतीने अभ्यंकर बंधू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
(News and all photo by BAnews24)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा