four-wheeler-fire-baralinga-akl: बारालिंगा गावाजवळ चार चाकी गाडीने घेतला अचानक पेट



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सर्विसिंग पूर्ण करून चाचणी घेत असताना अकोल्यातील बारालिंगा गावाजवळ एका चार चाकी गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना आज घडली.


अकोला मुंबई महामार्गावरील असलेल्या एका नामांकित  कंपनीच्या शोरुम मध्ये

गाडीची सर्विसिंग पूर्ण झाल्यानंतर गाडी मालकाला गाडीत बसून ट्रायल करिता ही गाडी नेली असता, गाडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने प्रसंगवधान राखत  गाडीतील सर्व प्रवासी खाली उतरले आणि गाडीने अचानक पेट घेतला.



आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाने शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, या आगीत ही चार चाकी गाडी संपूर्ण जळून खाक झाली आहे. तर गाडी मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही समजू शकल नाही.

टिप्पण्या