dabki-road-widening-work-akl: डाबकी रोड रुंदीकरण कामाला प्रत्‍यक्षात सुरुवात; नागरिकांनी वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा उपयोग करावा- अकोला मनपाचे आवाहन



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारा जुने शहरातील डाबकी रोड रुंदीकरण कामाला प्रत्‍यक्षात सुरूवात केलेली आहे. जमीन अधिग्रहण केल्‍यानंतर नागरिकांच्‍या अनेक प्रकारच्‍या शंका-कुशंकांना आता पुर्ण विराम लागला असून, अकोला महानगरपालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरण काम गतीने सुरू केले आहे.


पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये 2.34 कोटी खर्च करून 263 मीटर म्‍हणजेच भिरड होटल ते छाया हॉस्‍पीटल पर्यंतचा रस्‍ता जून अखेर पर्यंत पुर्ण करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. 



या रस्‍त्‍यामध्‍ये दोन्‍ही बाजुने 6-6 मीटर दोन लेन कॉंक्रीट रस्‍ता डिवाईडर व दोन्‍ही बाजूने नाल्‍या आणि शोल्‍डर असा मोठा रस्‍ता डाबकी रोड वासियांसाठी तयार करण्‍यात येणार आहे.





डाबकी रोड भागात वास्‍तव्‍य करणा-या आणि ये - जा करणा-या नागरिकांनी या रस्‍त्‍याचे काम सुरू असे पर्यन्त  वाहतुकीस अडचण होवू नये, यासाठी शक्‍यतोवर पर्यायी, वळण मार्गाचा वापर करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अकोला महानगरपालिका प्रशासना तर्फे नागरिकांना केले आहे.

टिप्पण्या