sarpanch-husband-take-bribe: महिला सरपंच पतीचा कारनामा; एक हजार रुपयेची लाच घेताना अडकला ACB च्या सापळ्यात

  प्रातिनिधिक चित्र/संग्रहित चित्र 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मूर्तिजापूर तहसील मधील सालतवाड गावाच्या महिला सरपंचच्या पतीला आज एक हजार रुपयेची लाच स्वीकारताना अकोला एसीबीने अटक केली आहे. देवानंद गणपत जामनिक, (वय-57 वर्ष, व्यवसाय शेतमजुरी रा. ग्राम उमई, पोस्ट-जाभा बु. ता मुर्तिजापुर जि. अकोला) असे या सरपंच पतीचे (आरोपी) नाव आहे. BAnews24 




एसीबी पथकाने केलेल्या कारवाईत, आरोपी देवानंद जमनिक याने तीन हजार रूपये लाच मागणी करून तडजोडी अंति एक हजार रूपये लाच रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाले. बीएन्यूज24 आंबेडकर चौक, एस टी. स्टॅन्ड मुर्तिजापूर (ता. मुर्तिजापुर जि. अकोला) येथे आरोपी लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेला. BAnews24


प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी  की, यातील तक्रारदार यांनी 26 फेब्रुवारी 2025 रोजी अँटी करप्शन ब्यूरो कार्यालय अकोला येथे तक्रार दिली की, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावे ग्राम सालतवाडा ता. मुर्तिजापुर जि. अकोला येथील विटा सिमेंटचे पक्के बांधकाम केलेले घर बक्षीसपत्रान्वये त्यांचे नावावर केले आहे. सदर बक्षीसपत्राची नोंद ग्राम पंचायत अभिलेखावर होवुन घराचा नमुना 8 अ मिळणेकामी तक्रारदार यांनी सदर बक्षीसपत्राची एक झेरॉक्सप्रत सालतवाडा गट ग्रामपंचायत येथे दिलेली आहे.


गट ग्रामपंचायत सालतवाडा येथील महीला सरपंच सिमा देवानंद जामनिक यांचे सर्व काम त्यांचे पती गैरअर्जदार  देवानंद जामनिक पाहत असल्याने तक्रारदार हे सरपंच पती गैरअर्जदार  देवानंद जामनिक यांना भेटले व सदर बक्षिसपत्राची नोंद ग्रामपंचायत अभिलेखावर करून घराचा नमुना 8 अ देण्यास विनंती केली. त्यावर सरपंच पती  देवानंद जामनिक यांनी तक्रारदारला तीन हजार रूपये लाच रकमेची मागणी करीत आहेत, अशा आशयाची तक्रारदार दिली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने 26 फेब्रुवारीला आंबेडकर चौक, एस.टी. स्टॅन्ड, मुर्तिजापुर येथे शासकिय पंचासमक्ष पडताळणी कार्यवाही केली असता, गैरअर्जदार देवानंद जामनिक यांनी बक्षिसपत्राची नोंद ग्रामपंचायत अभिलेखावर करून घराचा नमुना 8 अ देण्याकरीता सरपंच पती गैरअर्जदार देवानंद जामनिक यांनी तडजोडी अंति एक हजार रूपये लाच मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.


शासकिय पंचासमक्ष आज 27 फेब्रुवारी रोजी आंबेडकर चौक, एस.टी. स्टॅन्ड, मुर्तिजापुर येथे सापळा कार्यवाही आजमाविली असता, ग्राम सालतवाडा गट ग्रामपंचायतच्या महिला सरपंच यांचे पती गैरअर्जदार  देवानंद जामनिक तक्रारदार यांच्याकडुन एक हजार रूपये लाच रक्कम स्विकारल्याने अँटी करप्शन ब्युरो कार्यालय अकोला येथील अधिकाऱ्यांनी सापळा कार्यवाही करून आरोपी  देवानंद जामनिक (खाजगी इसम) यांना ताब्यात घेतले आरोपी विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 76 प्रमाणे पोलीस स्टेशन मुर्तिजापुर शहर (ता. मुर्तिजापुर जि. अकोला) येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



कार्यवाही पोलीस अधिक्षक  मारूती जगताप, अपर पोलीस अधिक्षक  सच्छिंद्र शिंदे, अँटी करप्शन ब्युरो अमरावती व पोलीस उपअधिक्षक  मिलींदकुमार बहाकर अँटी करप्शन . ब्युरो अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सावंत, अ.क. ब्युरो अकोला तसेच पोलीस अंमलदार डिगांबर जाधव, किशोर पवार, प्रदिप गावंडे, अभय बावरकर, निलेश शेगोकार, श्रीकृष्ण पळसपगार, चालक पो.हवा. सलिम खान सर्व अ. क. ब्युरो अकोला यांनी केली आहे.


कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्यावतीने कोणत्याही खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अन्टी करप्शन ब्युरो अकोला येथील कार्यालयाला संपर्क साधावा, असे आवाहन  मिलींद बहाकर पोलीस उपअधिक्षक,  सचिन सावंत पोलीस निरीक्षक यांनी केले.





टिप्पण्या