road-accident-on-flyover-akola: उड्डाणपुलावर दुचाकी व कार मधे जोरदार टक्कर; एक गंभीर जखमी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अग्रसेन चौक कडून जेल कडे जाणाऱ्या उड्डाणपूलवरील रस्त्यावर आज 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास दुचाकी व चारचाकी (कार) वाहनात जोरदार टक्कर झाली. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असल्याचे समजते.




वृत्त लीहेस्तोवर प्राप्त प्राथमिक माहितीनूसार, सुंदराबाई खंडेलवाल टॉवर जवळील उड्डाणपुलावर हा भीषण रस्ता अपघात मोटरसायकल MH 30 AC 1541 आणि कार स्विफ्ट डिजायर MH30 BL 2219 या दोन वाहनात झाला. मोटरसायकल स्वार एक युवक  गंभीर जखमी झाला आहे. 



जखमी युवकास जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती होताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. 



शेख साबिर शेख इमाम ,(वय 44 वर्ष  अकबर प्लॉट अकोट फाइल अकोला) असे जखमीचे नाव असल्याचे कळते.

टिप्पण्या