private-luxury-bus-overturns: खासगी लक्झरी बस उलटुन अपघात; एक ठार, पाच गंभीर, 20 ते 25 जण किरकोळ जखमी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला/वाशिम: समृद्धी महामार्गावर वनोजा  चेंजर पाॅईन्ट टोल ते मालेगाव कडे पाच की.मी.अंतरावर खासगी लक्झरी बस उलटुन झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच जण गंभीर तर 20 ते 25 जण कीरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.


आज पहाटे हा अपघात घडला. घटनास्थळावर वाशिम आरडीसी विश्वनाथ घुगे, मंगरूळपीर तहसीलदार शितल बंडगर उपस्थित होते, अधिकाऱ्यांच्या  मार्गदर्शनात मदत कार्य करण्यात आले.





आज 17 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 05 वाजताचे सुमारास समृद्धी महामार्ग चॅनेल नं 215 वनोजा टोल प्लाझा पासून अंदाजे 5 किमी अंतरावर ट्रॅव्हल्स लक्झरी बस क्र. MH 14 HG 6667 चा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी आहेत. तर 20 ते 25 जण कीरकोळ जखमी असून, त्यांना उपचारासाठी कारंजा आणि अकोला रवाना करण्यात आले. 


अपघातानंतर गाडी सरळ करुन सुरक्षित ठीकाणी ठेवण्यात आली. घटना स्थळावर समृद्धी महामार्ग सुरक्षा टीम, संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक, पोलीस टीम, पवन राठी मित्र परीवार, आमदार शाम खोडे, जि.प.सदस्य पांडुरंग कोठाडे आदी हजर होते.



टिप्पण्या