- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
political-news-congress-party: अर्थसंकल्पात जनतेच्या फायद्याचे असे काहीच नाही - अतुल लोंढे यांची केंद्र सरकारवर सडकुन टिका
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
*सोयाबीनला ७ हजार रु. भाव देऊन शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी
*बजेटमध्ये कापूस उत्पादकता मिशनची केवळ घोषणा;मात्र टेक्सटाईल पार्कच नाही.
*विदर्भ पूत्र असलेले ना.गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्याय द्यावा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: केंद्रीय अर्थसंकल्पात कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी पाच वर्षांसाठी कापूस उत्पादकता मिशनची घोषणा करण्यात आली. परंतु कापुस उत्पादक भागांमध्ये टेक्सटाईल पार्कच नाहीत. अमरावती मध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्यात येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी हा पार्कच आम्हाला दिसला नाही, अशा शब्दात प्रदेश काँग्रेसचे मुख्य व राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी रविवारी केंद्र सरकारवर सडकुन टिका केली. ते आज अकोला दौऱ्यावर असताना स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यातील महायुतीचे शासन कास्तकारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न असणाऱ्या सोयाबीनच्या दराबाबत उदासीन असून दर देण्याच्या संदर्भात हे सरकार चालढकल करत असुन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करीत असल्याचा आरोप करंत ह्या सरकारने शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करुन सोयाबीनला 7 हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी लोंढे यांनी केली.
विदर्भाच्या तोंडाला पाने पुसली
ह्या केंद्राच्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. विदर्भ पूत्र असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी विदर्भाला न्याय द्यावा, असेही लोंढे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला. मात्र यात शेतीसाठी अत्यल्प तरतूद करण्यात आली. विदर्भ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त विभाग असून, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केल्याची टिका प्रवक्ते लोंढे यांनी केली. सोयाबीनला प्रती क्विंटल सात हजार रुपयांचा भाव देण्याची ग्वाही भाजपने दिली हाोती . मात्र आता अकोल्यात 4 हजार 200 पेक्षा जास्त भाव मिळत नाही. अशाच शासकीय साेयाबीन खरेदी सुद्धा बंद झाली. हेक्टरी उत्पादन खर्च वाढला तरी शेतकऱ्यांना उत्पन्न मात्र त्या तुलनेने मिळत नाही. मनरेगाअंतर्गतही काम मिळत नसून, सामान्यांसह सर्वच समाज घटकांचा फसवणूक भाजपने केली, असाही आराेप प्रवक्ते अतुल लाोंढे यांनी केला.
घोषणा हवेतच
कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने पाच वर्षांसाठी कापूस उत्पादकता मिशनची घाेषणा केली. यात शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी अद्याावत तंत्रज्ञान पुरवण्यात येणार असून, अतिरिक्त लांब धागाचे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. याच अनुषंगाने अमरावती येथे टेक्सटाईल पार्क उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आम्ही अमरावती येथे स्थानिक खासदारांना साेबत घेत पाहणी केली. मात्र पार्क पीएम मित्र याेजनेअतंर्गत हा पार्कच दिसला नाही, असेही लाेंढे म्हणाले.
वाढलेल्या मतदार संख्येवर प्रश्नचिन्ह
गतवर्षी लाेकसभेच्या तुलनेने विधानसभा निवडणुकीत 63 हजार 9 मतदार वाढले हाेते. लाेकसभा निवडणुकीत (जिल्ह्यातील) 15 लाख 74 हजार 885 तर विधासनभा निवडणुकीत मतदारांची संख्या 16 लाख 37 हजार 894 हाेती. सध्या लाेकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या वाढलेल्या संख्येवरून वाद सुरु असून, लाेकसभेत विराेधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जाेरदार हल्ला चढवला हाेता. यावरही प्रवक्ते लाेंढे यांनी भाष्य केले. अचानक मतदारांची संख्या कशी वाढली, असा सवाल करीत महायुतीला मिळालेले बहुमत हे चाेरलेले आहे, अशा शब्दात त्यांनी हल्लाबाेल केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काॅग्रेस जाती-धर्मावर राजकारण करीत नसल्याचेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला कपिल ढोके, अशोक आमानकर, सुधीर ढोणे आदी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
............
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा