- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
beer-mix-soft-drink-commit-crime: सॉफ्ट ड्रिंक मध्ये बियर मिसळवून केला सामुहिक अत्याचार; फरार बंटी सापडला सहा महिन्यानंतर, मैत्रीणीनेच केला मैत्रिणीचा विश्वास घात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: वाढदिवसाचा बहाणा करून बोलवून घेत अल्पवयीन मुलीच्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये बियर मिसळवली. यानंतर मुलीवर सामुहिक अत्याचार केला . या प्रकरणातील फरार आरोपी प्रशांत उर्फ बंटी हा सराईत गुन्हेगार असून अनेक गंभीर गुन्हे त्याच्या नावावर विविध पोलीस स्टेशनला नोंद आहे. हा फरार आरोपी पोलीसांना सहा महिन्यानंतर सापडला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात मैत्रीणीनेच मैत्रिणीचा विश्वास घात करून नियोजनपूर्वक ही घटना घडवून आणली असल्याचे तपासात समोर आले होते. यापूर्वी एका युवतीस याप्रकरणात अटक करण्यात आली होती.
पोलीस स्टेशन जुनेशहर येथे हा गुन्हा दाखल असून, पोक्सो गुन्हयातील आरोपी बंटी हा सहा महिन्यापासुन फरार होता. बंटी हा सराईत गुन्हेगार असून आज स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे कडुन त्याला अटक करण्यात आली आहे.
25 सप्टेंबर 2024 रोजी पो. स्टे जुने शहर, अकोला अप नं. 517/2024 कलम 64(2) (च), 65, 70,351, (1), (2) भा. न्या. सं सह कलम 4 (2),5, (जी), (पी), 6,12 पाक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयातील फिर्यादी यांनी तक्रार दिली कि, फिर्यादी हिला विश्वासात घेवुन 09 सप्टेंबर 2024 रोजी यातील आरोपी व त्याचे साथीदारांनी मिळून फिर्यादी हिला सॉफ्ट ड्रिंक पिण्यास सांगितले. सदर सॉफ्ट ड्रिंक मधे आरोपींनी बियर मिळवीली. फिर्यादी नशेत असताना आळीपाळीने तिच्या मनाविरुध्द जबरदस्तीने शरिरसंबध केले. याबाबत कोठेही वाच्यता केल्यास तुझा घरच्याना मारून टाकेल, अशी धमकी आरोपींनी दिली. अशा रिपार्ट वरून पो. स्टे जुने शहर अकोला येथे अप नं. 517/2024 कलम 64 (2), (च),65,70,351, (1), (2) भा. न्या. सं सह कलम 4(2), 5, (जी), (पी), 6, 12 पोक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
असा अडकला जाळ्यात
या गुन्हयातील फरार सराईत आरोपी प्रशांत उर्फ बंटी सुनिल सटवाले (रा हरिहर पेठ दसेरा नगर अकोला) हा घटना तारखेपासुन फरार होता. गुन्हयाची गांभीर्याने दखल घेवुन पोलीस अधीक्षक अकोला यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी पथक तयार केले. या पथकास गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणावरून सदर गुन्हयातील फरार आरोपी हा उज्जैन (मध्यप्रदेश) येथुन लक्झरी गाडीने निघाला असल्याची माहीती मिळाल्याने खामगाव शेगाव दरम्यान लक्झरी अडवुन चेक केली असता, आरोपी प्रशांत उर्फ बंटी सुनिल सटवाले (रा हरिहर पेठ दसरा नगर अकोला) हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील तपास कामी पो. स्टे. जुनेशहर यांचे ताब्यात देण्यात आले.
मध्यप्रदेशात होता फिरत
सदर गुन्हयातील फरार सराईत गुन्हेगार प्रशांत उर्फ बंटी सुनिल सटवाले (रा हरिहर पेठ दसेरा नगर अकोला) हा घटना तारेख पासुन फरार असुन फरारी दरम्यान तो मुबंई, पुणे, नागपुर, उज्जैन, इदौर, ओमकारेश्वर (मध्यप्रदेश) इत्यादी भागात फिरत असल्याची कबुली दिली.
सराईत गुन्हेगार आरोपी प्रशांत उर्फ बंटी सुनिल सटवाले रा हरिहर पेठ दसेरा नगर अकोला हयाचे विरूध्द यापुर्वी वेगवेगळ्या पो. स्टे. ला गुन्हे दाखल आहेत.
पो. स्टे जुनेशहर
अप.क १८०/२०१७, कलम १४३,१४७,१४९, ३०२, १२० (ब) भादवि
पो स्टे पातुर
अप.क १९९/२०१९, कलम ३९४, ३४ भादवि
पो.स्टे डाबकी रोड
अप.क ९१/२०१६, कलम ३९२,३४ भादवि
पो. स्टे सिटी कोतवाली
अप. क २००/२०१९, कलम १४३,१४७,१४८,३४१,३२४,३२३,४२७ भादवि
पो.स्टे जुनेशहर
अप.क १३६/२०२२, कलम ३९७,३९४,३२४,२९४,४ भादवि
पो.स्टे जुनेशहर
अप.क ८९/२०१६, कलम ३२४, ३२३,५०४, ३४ भादवि
पो.स्टे जुनेशहर
कलम ६४ (२), (च),६५,७०,३५१, (१), (२) भा. न्या. सं सह कलम ४(२), ५, (जी), (पी), ६, १२ पोक्सो ॲक्ट
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, सपोनि विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, माजीद खान पठाण, पो.हवा. रविद्र खंडारे, खुशाल नेमाडे, सुलतान पठाण, पो.कॉ. आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, राहुल गायकवाड, पो स्टे सायबरचे आशिष आमले चालक पो.हवा. अक्षय बोबडे यांनी केली.
एका आरोपीस बार्शीटाकळी महान मार्गावरून अटक, तर आरोपी युवतीची कारागृहात रवानगी
जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. बहुचर्चित याप्रकरणी आरोपी कुणाल सुनील मनवानी ( वय 24, रा. कच्ची खोली, सिंधी कॅम्प, अकोला) याला बार्शिटाकळी महान मार्गावरून पोलिसांनी अटक केली होती. तसेच अटकेतील आरोपी युवतीला न्यायालयासमोर हजर केले असता, तिची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. इतर आरोपी होते.
एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाणे हद्दीत घडली असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात मैत्रिणीनेच मैत्रिणीचा विश्वासघात करून अनैतिक व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आले. अल्पवयीन पिडीत मुलगी ही दहावीच्या शिक्षणासाठी अकोल्यात वास्तव्यास आहे. यादरम्यान तिची मैत्री आरोपी युवती सोबत झाली, आणि आरोपी युवतीने पीडित मुलीची मैत्री आपल्या तीन मित्रांसोबत करून दिली. पीडित मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला एका ठिकाणी बोलविण्यात आलं. यानंतर या आरोपींनी शीतपेयच्या नावाने पीडितेला गुंगीचे येण्याचे पेय पाजण्यात आले. त्यानंतर दोन आरोपींनी तिच्यावर सामुहिक अतिप्रसंग केला. आरोपी युवती आणि तिच्या साथीदाराने याची चित्रफीत तयार केली. या गोष्टीची वाचा कुठं फोडल्यास हा व्हिडिओ व्हायरल करणार, अशी धमकी पीडितेला दिली. यांनतर पीडित मुलीला आरोपींनी वारंवार फोन करून अनैतिक व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र मुलीने हा प्रयत्न धुडकाडवून लावला होता.
दरम्यान, बुधवार 25 सप्टेंबर 2024 रोजी पीडित मुलीने जुने शहर पोलीस ठाणे गाठून, पोलिसांना आपबिति सांगितली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी लल्ला इंगळे, बंटी सटवाले, एक युवती आणि चिक्की नावाचा आणखी एक अश्या चारही आरोपी विरुद्ध पोस्को सह विविध कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.
पोलिसांनी यातील आरोपी युवतीला अटक केली होती. फरार तिन्ही आरोपींचा शोध पोलीस घेत होते. अटकेतील आरोपी युवतीला न्यायालयासमोर हजर केले होते. तिला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपी युवती न्यायालयासमोर हजर केले असता, तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तर या प्रकरणात एका आरोपीची वाढ झाली होती. कुणाल मनवानी असे या आरोपीचे नाव आहे. तर आज सराईत गुन्हेगार बंटी हा पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
Akola crime
Akola police
Beer
Crime news
lcb akola
old city
police custody
Police station
soft drinks
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा