- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
bail-granted-akola-court-news: विनयभंग करणाऱ्या आरोपीला जामीन; मोबाईल फोन पोलिसांकडे जमा करण्याचे न्यायालयाचे आदेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आरोपी तर्फे वकील नजीब शेख
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली, असा आरोप एका युवकावर मुलीच्या पालकांनी करीत पोलिसात तक्रार दिली होती. या आरोपी युवकाचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायालयात आरोपीची बाजू अधिवक्ता नजीब शेख यांनी मांडली.
कृषी नगर येथे राहणाऱ्या या युवकाने एका शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग केला होता. याप्रकरणी आरोपी युवकाने पीडितेला तक्रार दिल्यास तिचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपीच्या अटकपूर्व जामिनासाठी वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. दोन्ही पक्षांची उलट तपासणी ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज स्वीकारला.
5 फेब्रुवारी 2025 रोजी त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन अंतर्गत कृषी नगर मध्येच राहणाऱ्या 20 वर्षीय आदित्य दास नावाच्या युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यामध्ये आरोप केला होता की, आदित्य दास तिच्या 14 वर्षाच्या मुलीचा पाठलाग करतो आणि छेड काढतो. आदित्य दासला समजावले असता, त्याने मुलीचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करणार, अशी धमकी दिली.
अल्पवयीन मुलगी ट्यूशन क्लासला जात होती. ती घरी परतत असताना आरोपीने पुन्हा तिचा पाठलाग करत तिचा हात धरून तिचा विनयभंग केला.
मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध बी.एन.एस.एस.च्या कलम 74, 75, (2), 78 (1), 351 (2), 351(3) तसेच कलम 12 पॉक्सो कायद्यानुसार एफआयआर नोंदवला.
पोलिसांकडून एफआयआर दाखल झाल्याची माहिती आदित्य दास याला मिळताच त्याने अधिवक्ता नजीब शेख यांच्यामार्फत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.
या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलांनी युक्तिवाद केला की, आरोपी आदित्य दास आणि पीडितेच्या कुटुंबात कौटुंबिक संबंध आहेत. केवळ आर्थिक व्यवहार केल्यामुळे एफआयआर नोंदवण्यात आला आहे, आदित्य दासच्या हातून अशी कोणतीही घटना घडली नाही. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. क्षीरसागर यांनी वकिलांनी मांडलेला युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. तसेच मोबाईल फोन तपासी अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आदेश दिले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा