- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-bar-association-election: अकोला बार असोसिएशन निवडणूक: हेमंत मोहता दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान; संतोष वाघमारे, सुनिता कपिले उपाध्यक्ष तर सहसचिवपदी प्रदीप रोकडे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला बार एसोसिएशनची सर्वसाधारण निवडणूक 2025 आज शनिवार 1 फेब्रुवारी रोजी अकोला जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात पार पडली. एकूण 1318 सदस्यांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. ॲड. हेमसिंह उर्फ हेमंत मोहता यांनी सर्वाधिक मत घेऊन अध्यक्षपदाची विजयी माळ आपल्या गळ्यात घातली. हेमंत मोहता हे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले आहेत. मागील वर्षी त्यांनी अकोला वकील संघाच्या विकासासाठी केलेल्या कामाची पावती म्हणून ही निवडणूक त्यांनी जिंकल्याचे बोललेल्या जात आहे. ॲड. हेमंत मोहता हे प्रसिद्ध फौजदारी विधीज्ञ मोतीसिंह मोहता यांचे सुपुत्र आहेत.
अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात लढत देत होते. यामध्ये फौजदारी विधीज्ञ एडवोकेट दिलदार खान, एडवोकेट हेमसिंह मोहता यांच्यात काट्याची टक्कर झाली. एडवोकेट खान यांनी 480 मत मिळवले तर एडवोकेट मोहता यांनी 642 मत घेऊन विजयश्री मिळविला तर एडवोकेट रविकांत ठाकरे यांनी 193 मते मिळवले. यामध्ये तीन मते अवैध ठरली.
उपाध्यक्ष (पुरुष) पदासाठी देखील उमेदवार रिंगणात होते. ॲड. मिलिंद लहरिया आणि एडवोकेट संतोष वाघमारे यांच्यात खरी लढत झाली. एडवोकेट वाघमारे यांनी यात बाजी मारली. एडवोकेट वाघमारे यांनी 642 तर एडवोकेट लहरिया यांनी 568 मत मिळवली तर तिसरे उमेदवार सौरभ तेलगोटे यांनी केवळ 99 मते मिळवली. यामध्ये नऊ मते अवैध ठरली.
महिला उपाध्यक्ष पदासाठी एडवोकेट संगीता गावंडे आणि ॲड. सुनिता कपिले हे दोन उमेदवार रिंगणात होते. सुरुवातीपासूनच या दोन्ही उमेदवारात कट्टर लढत झाली. एडवोकेट कपिले या पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे गेल्या तर एडवोकेट गावंडे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली. कपिले यांनी या निवडणुकीत तब्बल 899 मते मिळवले त्यांना एडवोकेट गावंडे यांनी चांगली टक्कर दिली. एडवोकेट गावंडे यांनी 405 मिळविली. यामध्ये 14 मते अवैध ठरली.
सहसचिव पदासाठी तिरंगी लढत झाली. एडवोकेट साक्षी लढ्ढा, एडवोकेट प्रदीप रोकडे आणि एडवोकेट महेश शिंदे हे तीन उमेदवार रिंगणात होते. सहसचिव पदासाठी बऱ्याच वर्षांनी महिला उमेदवार साक्षी लढ्ढा या निवडणुकीत उतरल्या होत्या. यापूर्वी ॲड. अंजली कदम, ॲड. नीलिमा शिंगणे, ॲड. मीनाक्षी बेलसरे यांनी सहसचिव पदाकरिता निवडणूक लढविली होती. बऱ्याच वर्षानंतर साक्षी लढ्ढा यांनी सहसचिव पदाकरिता निवडणुकीत लढत दिल्याने साक्षी यांचे कौतुक झाले. साक्षी यांनी चांगली लढत देत 273 मते मिळविले ॲड. महेश शिंदे यांनी 462 मते मिळवली तर विजयी उमेदवार एडवोकेट प्रदीप रोकडे यांनी 573 मते मिळवून विजय मिळविला. यामध्ये दहा मते अवैध ठरली.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या आणि मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. यु. पी. नाईक यांनी काम पाहिले. ॲड. ए. जे. ठाकूर, ॲड. सत्यनारायण जोशी ॲड. धीरज शुक्ला, ॲड. गणेश पाठक ,ॲड. वखरे आदींसह रवि श्रीवास्तव यांनी त्यांना सहकार्य केले.
सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा
Akola Bar Association
Election 2025
Hemant Mohta
Joint Secretary
Pradeep Rokade
President
Santosh Waghmare
Sunita Kapile
Vice Presidents
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा