- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
student-attacked-extortionist: मेस मधून परतणाऱ्या विद्यार्थ्यावर खंडणी बहाद्दरने केला हल्ला; आमदार सावरकर यांची पोलीस स्टेशनला धाव, सर्व हल्लेखोर अल्पवयीन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मेस मधून परत येत असलेल्या विद्यार्थ्याला काही टारगट मुलांनी मारहाण केल्या मुळे सिव्हिल लाईन्स परिसरात गुरुवारी रात्री काही वेळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच अकोला पूर्व चे आमदार रणधीर सावरकर यांनी घटनेचे गांभीर्य रात्री 11 वाजताच्या सुमारास सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात पोहचून विद्यार्थ्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडावर कडक कारवाई करून विद्यार्थ्यांना सुरक्षा प्रदान करावी, अश्या सूचना पोलीस अधिकारी वर्गाला दिल्या.
अकोला शहर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. मात्र याला बदनाम करण्याचा कुटील डाव असामाजिक तत्त्व करत असेल तर त्यावर पोलिसांनी वचक लावावा व विद्यार्थ्यांना सुरक्षित चांगला वातावरण राहून अकोल्याचे नावलौकिक कायम राहावं, या दृष्टीने काम करा. ओम मांदूरके या विद्यार्थ्यांवर हमला करणाऱ्यावर गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी देवून, भविष्यात असा प्रकार होणार नाही यासाठी जवाहर नगर, रणपिसे नगर राऊतवाडी शासकीय दूध डेरी या भागात पोलीसग्रस्त वाढवण्यात यावी अशा सूचना दिल्या.
शासकीय दूध डेरी जवाहर नगर या रोडवर मेस वरून माजी आमदार हरिदास भदे यांच्या घराजवळील जेवण करून परत येत असताना डोणगाव येथील विद्यार्थ्यांना पैशाची मागणी करून मारहाण करण्यात आली. दगडफेक मध्ये त्याच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांना सूचना मिळाल्याबरोबर ताबडतोब सिव्हील लाईन पोलीस स्टेशनला धाव घेवून, त्यांनी विद्यार्थ्याला ताबडतोब दवाखान्यात पाठवून सर्वपरीने मदत करण्याचा अभिवचन दिले. तसेच भविष्यात अशा प्रकार होणार नाही या संदर्भात ठाणेदारांना तसेच एसपी, शहर सहाय्य पोलीस अधीक्षक यांच्याशी संवाद साधून अशा प्रकाराने अकोल्याचे नाव बिघडण्याचा प्रयत्न होत असून, याआधी सुद्धा विद्यार्थ्यांची हत्या झाली आता या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचा विषय होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकार होणार नाही. दादागिरी खपून घेणार नाही, अशा तत्त्वावर कारवाई करण्यात यावी. राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सजग असून असा प्रकार भविष्यात होणार नाही याची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचा वचक संपला का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन कारवाई करावी, अशा सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या.
सर्व हल्लेखोर अल्पवयीन
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार हल्लेखोर आरोपींची ओळख पटली असून, यातील तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. दोन 17 वर्षीय असून, पैसे मागणारा केवळ आठ वर्षाचा आहे. एका आरोपीला पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, उर्वरित दोघांना आज पोलीस ठाण्यात बोलवण्यात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, पैसे मागणाऱ्या आठ वर्षीय बालकाला फिर्यादी याने झापड मारली. त्यानंतर बालकाने आपल्या दोन साथीदारांना घटनास्थळी बोलविले. यानंतर येथे राडा झाला. याआधी देखील या हल्लेखोर मुलांनी अनेकांना लुटले असल्याचे परिसरात चर्चा आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा