somnath-suryavanshis-family: सोमनाथ सुर्यवंशीचे कुटुंबिय बाळासाहेब आंबेडकर यांच्या भेटीस अकोल्यात


 

भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: परभणी येथे संविधानाचे शिल्प फोडण्याच्या घटनेचा निषेध करणाऱ्या संविधान प्रेमीं व एल एल बी शिक्षण घेणारे सोमनाथ सुर्यवंशी यांना पोलिसांनी अटक करून बेदम मारहाण केल्यामुळे सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. एवढे दिवस उलटूनही सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई विजयाबाई व्यंकट सुर्यवंशी, भाऊ प्रेमनाथ सुर्यवंशी, मावशी तेजश्री दिगंबर विटकर, मावसा दिगंबर यलप्पा विटकर यांनी आज यशवंत भवन अकोला येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली.  



पोलीस व शासन आम्हाला न्याय देत नाही आहे तेव्हा आमचा फक्त आपल्यावरच विश्वास आहे, आपण आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती यावेळी सुर्यवंशी कुटुंबीयांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे केली. यावेळी वरिष्ठ अधिकारी व यंत्रणेशी बाळासाहेब आंबेडकर यांनी फोनवर चर्चा केली. 


माध्यमांशी चर्चा करतांनाही सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोपींना शिक्षा मिळावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करायला आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी अकोला आलो होतो व आमचा फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास आहे की ते आम्हाला न्याय मिळवून देतील, अशी प्रतिक्रिया सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना व्यक्त केली.

टिप्पण्या