- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
santosh-deshmukh-murder-: संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी; अकोल्यात निघाला जनआक्रोश मोर्चा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
स्व. संतोष देशमुख (बीड) यांची हत्या करणाऱ्यांना त्वरीत फाशीची शिक्षा व मृतक सोमनाथ सुर्यवंशी (परभणी) यांना न्याय मिळावा
मोर्चाचे नेतृत्व व प्रमुख मार्गदर्शन उपस्थिती वैभवी संतोष देशमुख
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा - आमदार नितिन देशमुख
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज सोमवार 20 जानेवारी रोजी राज राजेश्वर अकोला नगरीत सर्वधर्मीय व सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाचे नेतृत्व वैभवी संतोष देशमुख हिने केले. यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी या दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. दोन्ही गुन्ह्यातील मारेकऱ्यांना, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या दोघांच्याही कुटुंबाला न्याय देऊन महाराष्ट्राला जे बिहार बनवण्याचे प्रयत्न करीत आहे, अशा प्रवृत्तीच्या लोकांना सजा देऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणी करिता या मोचार्चे आयोजन केले होते.
मोर्चात अकोला जिल्ह्यातील सर्वपक्षीय व सर्वधर्मीय जनतेने सहभाग घेतला. जन आक्रोश मोर्चा स्थानिक अशोक वाटिका परिसरातून निघून सर्वोपचार रुग्णालय समोरून येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासह इतर मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
मोर्चात सहभागी नागरिकांनी काळे झेंडे दाखवून बीड व परभणी येथील दोन्ही अमानुष घटनेचा जाहीर निषेध केला. अतिशय शांततापूर्ण वातावरणात निघालेल्या या मोर्चात मृतक संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख, मुलगा विराज देशमुख यांच्यासह समाजातील सर्व जाती-धर्माचे, राजकिय पक्ष, विविध सामाजिक संघटनाने सहभागी होवून निषेध व्यक्त केला.
कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे
हत्या प्रकरणातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरीत गुन्हेगारांना त्वरीत अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे,अशी मागणी यावेळी वैभवी देशमुख यांनी केली.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा- आमदार देशमुख
या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अभय देणारे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा इशारा यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
या आहेत प्रमुख मागण्या
स्व. संतोष देशमुख यांच्या मारकऱ्यांना त्वरीत फाशीची शिक्षा द्यावी व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबीयांना न्याय द्यावा.
खंडणीतील आरोपीवर स्व. संतोष देशमुख याच्या हत्येचा कायदेशीर रित्या गुन्हा दाखल करण्यात यावा.
वाल्मीक कराड यांच्यावर वरदहस्त असणाऱ्या राजकीय मंडळीची एस. आय. टी. चौकशी करण्यात यावी.
कर्तव्यात कसुर करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फे व सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात यावा.
स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत यांच्या कुटुंबास व गावास पोलीस संरक्षण देण्यात यावे.
स्व. संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे.
एस.आय. टी. चौकशी साठी बाहेर जिल्ह्यातील अधिकारी नेमण्यात यावे
निर्भीड व विशेष सरकारी वकीलाची नेमणुक करण्यात यावी.
हा न्यायालयीन खटला बीड जिल्ह्याबाहेर व फास्टट्रॅक न्यायालयाद्वारे चालविण्यात यावा.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधीत आरोपी व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्या.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा