road-accident-vehicles-collide: तीन वाहन एकमेकास भिडले; तीन जखमी





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील अशोक वाटिका ते नेहरू पार्क चौक दरम्यान असलेली सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय जवळील त्रिवेणी चौकात आज दुपारी अडीच वाजताचा सुमारास विचित्र अपघात घडला. यात तीन वाहन एकमेकास भिडले. अपघातात तीन जखमी झाले आहेत. उड्डाणपुलावर चुकीच्या बाजूने वाहन प्रवेशित केल्यामुळे हा मोठा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.




प्राप्त माहितीनुसार या अपघातात कंटेनर, कार आणि दुचाकी मोटारसायकल समोरासमोर धडकले. एमएच 30 बीएन 8518 क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने चुकीच्या दिशेने उड्डाणपुलावर प्रवेश केला. त्याच्यामागे असलेल्या एमएच 30 बीबी 0911 क्रमांकाच्या कारनेही त्याच चुकीच्या दिशेने गाडी चालवली. त्याचवेळी समोरून एमएच 26 एडी 1859 क्रमांकाचा कंटेनर येत होता. पुलावर वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे या तीन वाहनांची समोरासमोर धडक झाली.



अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी आणि कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर बाइकस्वार दोन युवक आणि कार चालक जख्मी झाले. तिन्ही जखमींना पोलिसांनी तत्काळ शहरातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 


वाहतूक नियमांची ऐशीतैशी 


हा अपघात वाहतूक नियमांचे पालन न केल्याने झाला असल्याचे घटनास्थळी बोलल्या जात होते. मात्र उड्डाणपुलाची रचना ही अपूर्ण आणि गोंधळ निर्माण करणारी आहे. त्यामुळे वाहनचालक गोंधळून चुकीच्या दिशेने जातात. यामुळे  असे अपघात वारंवार घडत असल्याची चर्चा बघेकरींमध्ये सुरू होती.

टिप्पण्या