prayagraj-mahakumbh-mela-: प्रयागराज महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या शकुंतला नागापुरे घरी सुखरूप परतल्या



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: प्रयागराज महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्या निमित्त मंगळवारी रात्री उशीरा 'संगम नोज' परिसरात अचानक चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अकोल्यातील डाबकी रोड गजानन महाराज मंदिर परिसरातील महिला बेपत्ता झाल्या होत्या. मात्र त्यांनी धाडस दाखवून स्वतःच एकट्या घरी सुखरूप परतल्या. त्यांना तेथील एका पोलीस कॉन्स्टेबलने खुप मदत केली असल्याचे शकुंतला नागापुरे यांनी सांगितले.


सध्या महाकुंभ मेळावा सुरू असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना 'संगम नोज' या ठिकाणाचे फार आकर्षण दिसून येत आहे. त्यामुळेच या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दरम्यान अकोल्यातील भाविक सौ. शकुतला अंबादास नागापूरे या प्रयागराज येथे महास्नान करिता गेल्या होत्या. मात्र मंगळवारी रात्री अचानक झालेल्या चेंगराचेंगरी घटनेत त्या हरविल्या होत्या. दरम्यान नागापुरे यांच्या कुटुंबियानी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. दरम्यान बुधवारी रात्री त्या झाशी एक्सप्रेसने अकोल्याला घरी सुखरूप पोहचल्या. प्रयागराज येथे ज्यावेळी नागापुरे या हरवल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तेथील एका पोलिसांशी संपर्क केला. व आपबिती सांगितली. पोलिसांनी त्यांना धीर देत रेल्वे गाडीत बसवून दिले. आणि त्या सुखरूप 

घरी पोहचल्या. नागापुरे यांना त्या पोलिसांचे नाव जरी माहीत नसले तरी त्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत, आणि त्यांच्या मुळेच मी घरी सुखरूप पोहचले असल्याचे नागापुरे यांनी सांगितले.



शकुंतला अंबादास नागापुरे  या प्रयागराजला गर्दी मध्ये हरवल्या आहे. अकोल्यामधील गेलेल्या भाविकांना कोणाला त्या दिसल्या तर संपर्क साधावा ,असे आवाहन शिवसेनाचे माजी नगरसेवक शशिकांत वामनराव चोपडे यांनी केले होते. सर्व समाज माध्यमातून त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली होती. ज्यांनी ज्यांनी शकुंतला नागापुरे यांना शोधण्याचा विविध माध्यमातून प्रयत्न केला त्यासर्वांचे शशिकांत चोपडे यांनी आभार मानले आहेत.




टिप्पण्या