order-open-the-seal-wine-bar: अखेर आयुक्त कार्यालय मुंबई येथून धडकला बारचे सील उघडण्याचा आदेश



ठळक मुद्दे 


आमदार खंडेलवाल यांनी केली मध्यस्थी


 

अखेर पवनीकर यांचे आमरण उपोषण सुटले 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : जिल्हा वाईन बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पवनीकर यांची यश वाईन बार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला सील केली होती. तेव्हापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात मनमानी कारभाराचा आरोप करीत अतुल पवनीकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. सोमवारी आमदार वसंत खंडेलवाल यांनी उपोषण मंडपाला भेट देत या कारवाई संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्याशी संपर्क साधून, सदर प्रकरणी मध्यस्थी केली. तर याप्रकरणी सिलच्या कारवाईला स्थगिती देत सील उघडण्याचे आदेश दिले. अखेर यामुळे आमरण उपोषणाला बसलेले अतुल पवनीकर यांचे उपोषण सुटले. 


जिल्ह्यात अवैध दारू विक्री फोफावली असून, यामुळे बार चालकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. महामार्गावर असलेले ढाबे, हॉटेल यावर सर्रास पणे देशी विदेशी दारू विक्री जोमात सुरू असून, बुटलिंकिंग करीत शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लागत असल्याची गंभीर तक्रार जिल्हा वाईन बार असोसिएशनच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला अधीक्षक यांना दिली होती. तेव्हापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी निवेदन देणाऱ्या बार चालकांना नानाविध प्रकारे त्रास देणे सुरू केले असल्याचा आरोप असोसिशनकडून करण्यात येत होता. 



जिल्ह्यातील अनेक बार चालकांना नानाविध प्रकाराची नियमावली दाखवून दंडात्मक कारवाया करणे सुरू केले होते. या दंडात्मक कारवायांचे आर्थिक भुर्दंड तब्बल 20 ते 22 बार चालकांना बसले असल्याची माहिती यावेळी असोसिएनकडून देण्यात आली. 



अवैध दारू विक्री करणारे, बुटलिंकिंग करणारे सोडून शासनाला कोट्यवधी रुपयांचा अबकारी कर व विविध कर स्वरूपात महसूल देणाऱ्या बार चालकांवर कारवाई करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया यावेळी असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी दिली. 



प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या या उपोषणाला सोमवारी विधान परिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल यांनी भेट देत उपोषणकर्ते पवनीकर आणि बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेत तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबई आयुक्त यांच्याशी संपर्क साधत हा सर्व प्रकार त्यांना सांगितला आणि मध्यस्थी करीत सदर उपोषण सोडविले.




यावेळी श्रीकांत देशमुख, सिमांत तायडे, राजेश गोसावी, योगेश अग्रवाल, भूषण इंगळे, बबलू ठाकूर, अविभुषण रामिधामी , मनिष लुल्ला, नितीन शाहाकार, सचिन रघुवंशी, पुरुषोत्तम मांगटे यांच्यासह पदाधिकारी, बार संचालक उपस्थित होते. 




तात्काळ सील उघडण्याचे दिले आदेश 



आमरण उपोषणाला बसलेले वाईन बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पवनीकर यांचे यश वाईन बार कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सील करण्यात आले होते. सदर प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई आयुक्त यांनी या सील च्या कारवाईला स्थगनादेश देत तात्काळ सील उघडण्याचे आदेश दिले. तर पुढील आदेशापर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याचे सुद्धा आदेशात नमूद केले.

टिप्पण्या