Koli-Mahadev-samaj-melava: आदिवासी कोळी महादेव समाजाचा उपवर-वधू सुचक व पालक परिचय मेळावा





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: वऱ्हाड प्रांत कोळी महादेव जमात वधुवर सूचक मंडळ, अकोला यांच्या वतीने 19 जानेवारी रोजी जानोरकर मंगल कार्यालय, अकोला येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 




यावेळी मोठया संख्येने उपवर-वधू युवक युवती व पालकांनी सहभाग घेतला. 



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्याली श्री महर्षी वाल्मिकी मठ संस्थांनचे मठाधिपती हभप. ज्ञानेश्वर महाराज भोंडे व प्रमुख पाहूणे म्हणून आमदार रणधीर  सावरकर लाभले होते. यावेळी मान्यवरांनी समाजबांधवाना मार्गदर्शन केले. 


कार्यक्रमालया समाजातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष, सुधाकरराव घुंगरे, बेरार संस्था अध्यक्ष रघुनाथ खडसे, जमात विकास संघ अध्यक्ष राजेंद्र जुवार,  विलास सनगाळे, मनोहर बुध, अरुण किरडे, मधुकर तराळे, अविनाश नरोकार, धनराज जुनार ,सुरेश कुठे, प्रा. डॉ रविंद्र ढोरे, मानकर आदी उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल पाटील फुकट, जिवन किरडे, रामेश्वर खडसे, निलेश धनी, रवि भोवर, अनिल वानखडे, जीवन खोडके, जयदिप कोलटके यांनी अथक परिक्षम घेतले.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम अमकुरकार व  शितल आपोतीकर यांनी केले. आभार  प्रा डॉ. रविंद्र ढोरे सर योनी मानले.



टिप्पण्या