crime-mobile-phone-snatching: मोबाईल फोन चोरी: आरोपी 24 तासात मुद्देमालासह LCB अकोलाचे ताब्यात





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील मोबाईल फोन स्नॅचिंग करणारे आरोपी 24 तासात मुद्देमालासह LCB अकोलाचे ताब्यात आले आहेत.



रामदासपेठ पोलीस स्टेशन अकोला येथे  फिर्यादी आदीत्य दिपक दळवी (वय 22 वर्ष रा. शेलगाव देशमुख ता. मेहकर जि. बुलढाणा हमु. संतोष सावळे याच्या घरी भाडयाने देशमुख फैल अकोला) यांनी  21 जानेवारी रोजी फीर्याद दिली की, दिनांक 20 जानेवारी रोजी फिर्यादी हे रस्त्याने पायी जात असतांना, मोटार सायकल वर दोन अनोळखी इसमांनी येवुन (वर्णन चालक काळया रंगाचे शर्ट व मागे बसलेला पांढ-या रंगाचे शर्ट अशा वर्णनाचे) फिर्यादी याचे दोन मोबाईल एकुण कि.अं 14 हजार रूपये मुददेमाल हिसकावुन मोटर सायकल वरून पळुन गेले. अश्या फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पो स्टे रामदासपेठ अप क 26/2025 कलम 309 (4), 3 (5) भारतीय न्याय सहींता प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपासावर आहे.


या गुन्हयात पोलीस स्टेशन रामदासपेठ सह समांतर तपास करण्याचे आदेश  पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिल्यावरून सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान गोपनिय माहीती तसेच तांत्रिक विश्लेषणा वरून प्राप्त केली असता यातील आरोपी शोएब खान शब्बीर खान (वय 20 वर्ष) याने त्याचे साथीदारासह मिळुन यातील फिर्यादी व इतर पिडीत यांचे वेगवेगळया कंपनीचे मोबाईल फोन मोटार सायकलने जावुन हिसकावुन जबरी केली आहे. त्यावरून त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली की त्याने त्याचे जवळील मोटार सायकलने त्याचा साथीदार विधी संघर्ष ग्रस्त बालक याचे नमुद मोबाईल जबरीने हिसकावुन चोरी केले आहे. करीता त्यांचे कडुन गुन्हयात चोरी गेलेले REDMI कंपनीचा जुना वापरता आकाशी रंगाचा मोबाईल किंमत अंदाजे 8 हजार रूपये , REALME कंपनीचा जुना वापरता निळ्या रंगाचा मोबाईल किंमत अंदाजे सहा हजार रुपये तसेच गुन्हा करणे करीता वापरलेली काळया रंगाची जुनी वापरती HERO कंपनीची SPLENDER + विना नंबरची मोटर सायकल किं अ. 70 हजार रूपये असा एकुण 84 हजार रूपयेचा मुददेमाल जप्त करण्यात आला.  हे मोबाईल  गुन्हयातील असल्याची IMEI खात्री झाली असुन नमुद आरोपी तसेच जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे पुढील तपास करीता देण्यात आले आहे.


सदरची कार्यवाही  पोलीस अधिक्षक  बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, पोहवा फिरोज खान, सुलतान पठाण, वसीमोददीन, खुशाल नेमाडे, पो. कॉ आकाश मानकर, धिरज वानखडे, मो. आमीर, सतीष पवार यांनी केली.

टिप्पण्या