akola-municipal-corporation-: अकोला मनपाचा महत्वपूर्ण निर्णय: 2016 पासूनचे जन्‍म-मृत्‍युचे दाखले मिळणार आता झोन निहाय



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला महानगरपलिका येथे शहरातील नागरिकांना जन्‍म आणि मृत्‍यु  दाखला दिला जातो. परंतू मागील काही महिन्‍याचा आढावा घेतल्‍यानंतर यासाठी नागरिकांना खूप वेळ रांगेत ऊभा राहून नाहक त्रास सहन करावा लागत होता.


नागरिकांना होणारा त्रास व गैरसोय लक्षात घेता जन्‍म आणि मृत्‍युचे दाखले तात्‍काळ देण्‍यासाठी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्‍या आदेशान्‍वये (100 Days Plan For Field Officers) कार्यक्षेत्रातील अधिक-यांसाठी 100 दिवसाचे नियोजन च्‍या अनुषंगाने प्रशासनाव्‍दारा संगणीकृत केलेल्‍या जन्‍म आणि मृत्‍यु अभिलेखाचे 1 जानेवारी 2016 पासून ते आज पर्यंतचे CRS Portal वर नोंदणी झालेले जन्‍म आणि मृत्‍युचे दाखले 13 जानेवारी 2025 पासून क्षेत्रीय स्‍तरावर अर्थात संबंधीत झोन कार्यालयावर देण्‍याची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. तसेच 2016 पुर्वीचे जन्‍म आणि मृत्‍युचे दाखले हे मनपा मुख्‍य कार्यालय येथून भेटणार असून आणि घरी मृत्‍यु झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या नोंदणीसाठी मनपा मुख्‍य कार्यालयातून टोकन देण्‍यात आलेले आहेत, त्‍यांना त्‍यांचे दाखले मनपा मुख्‍य  कार्यालय येथे प्राप्‍त करता येईल. संबंधीत नागरिकांनी याची नोंद घेऊन या सुविधेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन मनपा प्रशासनाव्‍दारा करण्‍यात आले आहे.


क्षेत्रीय कार्यालय पुर्व झोन - 

रतनलाल प्‍लॉट चौक, अकोला, अंतर्गत येणारे भाग 


खरप बुजुर्ग, पांढरी, पंचशील नगर, न्यू तापडिया नगर, शेलार फाईल, संत कबीर नगर, रामदास पेठ, बिर्ला कॉलनी, ज्योती नगर, जठार पेठ, महाजनी प्लॉट, मराठा नगर, तापडिया नगर, केळकर प्लॉट, चौरे प्लॉट, रतनलाल प्लॉट, रामनगर, राऊतवाडी, सावंतवाडी, लहान उमरी, हनुमान नगर, सुधीर कॉलनी, पत्रकार कॉलनी, महसूल कॉलनी, आंबेडकर नगर, सिविल लाईन रोड, शास्त्रीनगर, गोकुल कॉलनी, कृषी नगर, लाला लाजपत राय सोसायटी, तोष्णीवाल ले-आउट, राजीव गांधी नगर, रवी नगर, निबंधे प्लॉट, गणेश नगर, राधाकृष्ण प्लॉट, गंगाधर प्लॉट, राजपूत पुरा, खोलेश्वर, अनिकट, कमला नेहरू नगर, निमवाडी, आळशी प्लॉट, मोठी उमरी, लोखंडे लेआउट, नेहरू नगर, ताथोड नगर, लक्ष्मी नगर, इंजीनियरिंग कॉलनी, विठ्ठल नगर, फतेपुरवाडी, चाळीस क्वार्टर, द्वारका नगर, चिंचोली रोड गुडधी, शिवर आदि.


क्षेत्रीय कार्यालय पश्चिम झोन, 

डाबकी रोड पोलीस स्‍टेशनच्‍या बाजुला, डाबकी रोड, अकोला, अंतर्गत येणारे भाग 


भगतवाडी, वानखडे नगर, फडके नगर, साई नगर, ज्ञानेश्वर नगर, खैर मोहम्मद प्लॉट, नेहरू नगर, शरीफ नगर, गुलजार पुरा, भीम नगर, जोगळेकर प्लॉट, अगरवेस, श्रीवास्तव चौक, शिवचरण पेठ, खिडकी पुरा, काळा मारुती मंदिर, नवाब पुरा, शिवाजी नगर, गणेश नगर, भारती प्लॉट, गोडबोले प्लॉट, रेणुका नगर, भिरड वाडी, पार्वती नगर, अयोध्या नगर, मेहरे नगर, आश्रय नगर, मनोरथ कॉलोनी, गजानन नगर, पोलीस वसाहत, राजेश्वर नगर, लुबीनी नगर, डाबकी गाव, गोयनका पार्क, अक्कलकोट, पोळा चौक, शिवसेना वसाहत, सोनटक्के प्लॉट, आनंद नगर, महाकाली नगर, हरिहर पेठ, दसरा नगर, चांदखा प्लॉट, हमजा प्लॉट, भागीरथी नगर, तथागत नगर, गुरुदेव नगर, अंबिका नगर, यशवंत नगर, गंगा नगर, पंचशील नगर, कमला नगर, इन्स्पेक्टर नगर, गीता नगर, रमाबाई आंबेडकर नगर, अकोली बुजुर्ग, अकोली खुर्द, जुना हिंगणा, सोमठाणा, न्यू हिंगणा वाशिम बायपास आदि.


क्षेत्रीय कार्यालय उत्‍तर झोन – 

जुनी मनपा शाळा क्रं. 2, रेलवे स्‍टेशन चौक, अकोला, अंतर्गत येणारे भाग 


नायगाव, संजय नगर, सिद्धार्थ नगर, बाळापूर रोड, शिलोडा, सलाम नगर, लक्ष्मी नगर, भारत नगर, अकोट फाईल, हमजा प्लॉट, गायकवाड मोहल्ला, मोचीपुरा, पूरपीडित कॉलनी, परदेशीपुरा, इंदिरा नगर, दुर्गा नगर, बांबूवाडी, शंकर नगर, बापू नगर, दमानी हॉस्पिटलचे मागचा भाग, लाडीज फैल, तार फैल, देशमुख फैल,  फिरदौस कॉलनी, मुजफ्फरनगर, नाजूक नगर, गौरक्षण नगर, मोहता मिल चाल, न्यू तार फैल, भवानी पेठ, गुलशन कॉलनी, सावतराम मिल, बैदपुरा, काला चबुतरा, हनुमान नगर आदि.


क्षेत्रीय कार्यालय दक्षिण झोन –अब्‍दुल कलाम आजाद मार्केट, सिंधी कॅम्‍प, अकोला अंतर्गत येणारे भाग 


पक्की खोली, सिंधी कॅम्प, कच्ची खोली, सिंधी कॅम्प, कैलास टेकडी, शास्त्री नगर, महात्मा फुले नगर, जेतवन नगर, ख्रिश्चन कॉलनी, खदान, बाजोरिया लेआउट, बलोदे ले-आउट, गायत्री नगर, आरोग्य नगर, लहरिया नगर, कौलखेड, उन्नती नगर, कृष्णा नगरी, मलेरिया कॉलनी, पावसाळे ले-आउट, खेतान नगर, न्यू खेतान नगर, श्रद्धा नगर-1, श्रद्धा नगर-2, धाबेकर नगर, जिल्हा परिषद कॉलनी, म्हाडा कॉलनी, कौलखेड, म्‍हाडा कॉलनी खडकी, शिवापुर, खडकी, मलकापूर, रवी नगर, वर्धमान नगर, केशवनगर, सरस्वती नगर, कोठारी वाटिका-1, कोठारी वाटिका-2, गोकुल कॉलनी, व्हीएचबी कॉलनी, रमेश नगर, मलकापूर, गजानन वाटिका, सिद्धार्थ कॉलनी, जुना आरटीओ रोड, माधव नगर, विजय हाऊसिंग सोसायटी, आदर्श कॉलनी, कीर्ती नगर, सहकार नगर, अंबिका नगर, हिराबाई प्लॉट, कपिल वस्तू नगर, आझाद कॉलनी, घोडदौड रोड, शिवणी आदी.

टिप्पण्या