resolve-the-issues-of-disabled: दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार - आ. साजिद खान पठाण


ठळक मुद्दे 

काँग्रेसच्या दिव्यांग विभागाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी विधानसभेत आगामी अधिवेशनात आवाज उठविणार असून त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करणार. तसेच दिव्यांग बांधवांचे प्रश्न हे आजपासून आपले प्रश्न त्यांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा काँग्रेसचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. साजिद खान पठाण यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या दिव्यांग विकास विभागाच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. 


मंगळवारी ( ता. ३ डिसेंबर ) रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या दिव्यांग विकास विभागाच्या वतीने जागतिक अपंग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनी दिव्यांग जनाची शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत बहुसंख्य दिव्यांग सहभागी झाले होते. स्थानिक मोठ्या पोस्ट ऑफिस समोरील मनपा शाळा परिसरातील या विभागाच्या कार्यालय परिसरातून आयोजित दिव्यांग रैलीस जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या दिव्यांग विभागाचे अध्यक्ष व रॅलीचे संयोजक सचिन शेजव यांच्या उपस्थितीत ही रॅली स्वराज्य भवन, धिंग्रा चौक, गांधी रोड, पंचायत समिती, रिझर्व माता मंदिर, सिटी कोतवाली परिसरातून मार्गक्रमण करीत परत मनपा शाळा परिसरातील दिव्यांग कार्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला. यानंतर या परिसरात दिव्यांग दिन कार्यक्रम संपन्न झाला. 




सचिन शेजव यांच्या अध्यक्षतेत संपन्न या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित आमदार साजिदखान पठाण, समाज कल्याण अधिकारी परिहार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सचिन शेजव यांनी नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांचे स्वागत केले. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात दिव्यांग वर्गाच्या समस्या निराकरणासाठी योग्य ते उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे सांगून जागतिक दिव्यांग दिनाच्या उपस्थित महिला पुरुष दिव्यांगांना आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात. 



संचालन दिलीप सरदार यांनी तर आभार संजय बर्डे यांनी मानलेत. यावेळी बहुसंख्य दिव्यांग महिला पुरुष उपस्थित होते.

टिप्पण्या