- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील बाळापूर येथे भुसावळवरून वाशिम कडे जाणाऱ्या एका खाजगी बसचा आज सायंकाळी सात वाजताच सुमारास अपघात झाल्याची घटना घडली.
यात्रा करून भुसावळ येथे उतरलेल्या वाशिम येथील भाविकांची ही खाजगी बस होती. वाशिमच्या परतीच्या प्रवासासाठी ही बस निघाली होती. मात्र बाळापुर शहराजवळील भिकुंड नदीजवळ अचानक बस चालकाचा तोल गेल्याने बस भिकुंड नदीत पलटी झाली. या बस मध्ये एकूण 49 प्रवासी प्रवास करत असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बाळापुर पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू असून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे. बस क्रमांक एम एच 37- 4999 आहे.
बस कोसळताच गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली. या नदी वरील पुलाला कठडे नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या पुलावर कठडे बसवण्याची मागणी बाळापूर शहरातील नागरिकांनी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा