new-buliding-akola-tehsil-sdo: अकोला तहसिल व एसडीओ कार्यालय नव्या इमारतीचे लोकार्पण नववर्षात!




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला :अकोला तहसिल तसेच एसडीओ कार्यालयाची आधुनिक सुविधा युक्त तीन मजली इमारत स्थानिक महानगरपालिकेच्या मागे तयार झाली असून, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा होणार असल्याचे समजते.


लोकार्पण सोहळ्याला राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे आहेत. तर कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्रीगण यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यासंदर्भात त्याची पूर्वतयारी, बांधकामाची व त्यासाठी अजून लागणारा निधी व वेगवेगळ्या सुविधा संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी आज इमारतीची पाहणी केली. 


याप्रसंगी आमदार सावरकर यांनी वेगवेगळ्या सुविधा तसेच तहसील कार्यालयासमोर बसणाऱ्या वाईंडर यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. निधी उपलब्ध करून देऊन सर्व सुविधायुक्त जनतेच्या सेवेसाठी व जिल्ह्यातील सर्वात मोठा तहसील अकोला तहसील असून, नागरिकांना अनेक अडचणीतून जावे लागत असल्यामुळे लवकरच जनतेच्या सेवेत उपलब्ध व्हावा, यासाठी निधी उपलब्ध करून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचा लोकार्पण सोहळा होत असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले. नामदार देवेंद्र फडणवीस अनेक विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी राज राजेश्वर नगरीमधील येत असून या दृष्टीने आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय केली. 




सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, डॉक्टर शरद जावळे, नितीन आवारे, मृणालिनी  ढंगाळे, सुरेश कव्हळे तहसीलदार, नंदकिशोर माहोरे मंडळ अधिकारी, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते. तसेच आमदार सावरकर यांच्यासोबत विजय अग्रवाल, गिरीश जोशी  आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 


टिप्पण्या