gas-cylinder-explodes-fire-akl: देशमुख फाईल परिसरात गॅस सिलेंडरचा विस्फोट; पाच घरांना आगीची झळ



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: रामदासपेठ पोलीस ठाणे हद्दीतील देशमुख फाईल परिसरातील विजय नगर बजरंग चौक येथे एका घरात आज दुपारी एक वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडरचा विस्फोट झाल्याची घटना घडली. यामुळे लागलेल्या आगीची झळ आजूबाजूच्या पाच घरांना पोहचली. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही. मात्र संसारपयोगी साहित्य व किंमती वस्तू जळून खाक झाल्याचे सूत्रांनी सांगितले.



घटनेची माहिती मिळताच मनपा अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान, स्थानिक नागरिक, पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.


आमदार पठाण यांची घटनास्थळी धाव


दरम्यान घटनेची माहिती मिळताच अकोला पश्चिमचे आमदार साजीद खान पठाण यांनी घटनास्थळ गाठले. आगीची झळ पाच घरांना पोहचली असून, सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र घरातील साहित्य जळून खाक झाले. सध्या या नागरिकांची तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली असून, प्रशासनाच्या मार्फत सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, तश्या सूचना केल्या असल्याचे आमदार पठाण यांनी सांगितले.


आज अतिशय दुर्दैवी घटना घडली शॉर्ट सर्किट झाल्यामुळे सिलेंडर फुटून गरीब मजदूरी करणारे संजय शामराव ढवळे, युनुबाई ढवळे, निर्मला निंबे, राजूभाऊ धामोडे, रवी गायकवाड यांच्या घरांचे लाखोंचे नुकसान होऊन घरे जळाली. यावेळी अग्निशामनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने येऊन आग विझवली. नुकसान झालेल्या जळालेल्या घरांची पाहणी करून शासकीय जेही मदत होईल त्यासाठी आम्ही तत्पर आहोत, अस आश्वासन घटनास्थळी दिलं.

     

साजिद खान पठाण 

आमदार अकोला पश्चिम विधानसभा




विजय अग्रवाल यांनी केली पीडितांची विचारपुस



पीडित वंचित तसेच संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करणे गॅस लिकेज विस्फोट प्रकरणी चौकशी होऊन गॅस कंपनीने मदत द्यावी तसेच शासनाने मदत द्यावी असे निर्देश भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय अग्रवाल यांनी दिले. 


आज खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांच्या माध्यमातून विजय नगर बजरंग चौकातील गॅस विस्फोटक घटनेची माहिती मिळताच शासनाकडे मदतची मागणी करून भाजपाच्या वतीने आर्थिक मदत दहा हजार रुपये प्रत्येकी देण्याचे अभिवचन विजय अग्रवाल यांनी देऊन पीडितांचे सांत्वना केली.  भाजप व राज्य शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे अभिवचन दिले. 


यावेळी संजय ढवळे, रवी  गायकवाड, निंबाबाई निंबे, अक्षय अरुणकर अरुलकर, राजेश घामोडे यांचे घराची नुकसान झाल्या असून या गॅस विस्फोटामध्ये पिडीतांची भावना समजून घेऊन शासनस्तर मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न करू, अशी अभिवचन दिले . 


खासदार अनुप धोत्रे दिल्ली येथे असून आमदार रणधीर सावरकर व आमदार वसंत खंडेलवाल मुंबईपासून अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहे. विजय अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जखमी मनपा कर्मचाऱ्याची सुद्धा विचारपूस केली. 



यावेळी माजी उपमहापौर सुनील  मेश्राम, पवन महल्ले, कमल खरारे, उज्वल बामणे, उमेश लखन, प्रकाश घोगलिया, राजेंद्र गिरी, रमेश अलकरी,  राम ठाकूर, कैलास रणपिसे, आकाश सावते, राहुल चौरसिया, संजय गोटफोडे, टोनी जयराज, नितीन राऊत आदी सोबत होते.



पोलीस कर्मचारी जखमी

देशमुख फाईल तारफाइल परिसर स्थित विजयनगर येथे बजरंग चौक जवळ झालेल्या सिलेंडर ब्लास्ट घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाले. पाच घरांचे अतोनात नुकसान झाले. घर जळून खाक झाली. अग्निशमन विभागचे तीन फायर इंजनने आगीवर नियंत्रण मिळविले. वाहन चालक कृष्णा गाडगे, अनिल जगताप, फायरमन प्रेम तायडे, हनुमान घाटोळे, भूषण ठोसर, स्वराज वल्लाद, दिनेश ठाकुर यांनी फायर ब्रिगेड हेड हारुण मनियार यांच्या मार्गदर्शनात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त केले. रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज बहुरे व पथक घटनास्थळी  उपस्थित होते. 


टिप्पण्या