flower-exhibition-in-akola-city: खंडेलवाल भवन येथील पुष्प प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला गार्डन क्लब व महाबीज द्वारा आयोजित दोन दिवसीय पुष्प प्रदर्शनीच्या पहिल्या दिवशी अकोलेकर नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. दिनांक 28 व 29 डिसेंबर असं दोन दिवस प्रदर्शन अकोल्यातील खंडेलवाल भवन येथे अकोला गार्डन क्लब च्या वतीने आयोजित केलेला आहे. दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अजित कुंभार व महाबीज चे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी प्रदर्शनीला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केलं. 



अकोला शहरातील पुष्पप्रेमी व पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या सहकार्याने दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यामध्ये विविध प्रकारचे गुलाब, शेवंती सह इतरही अनेक दुर्मिळ जातींच्या फुलांचा समावेश असतो. सोबतच कॅक्टस, इंडोर प्लांट्स, व विविध प्रकारच्या औषधीय गुणधर्म असणारे वृक्ष सुद्धा या प्रदर्शनीमध्ये बघायला मिळाले. काही दुर्मिळ वनस्पतींच्या जाती सुद्धा येथे प्रदर्शनीमध्ये असल्याने अकोलेकरांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. 


यंदा प्रदर्शनीच हे 51 व वर्ष असून पन्नास वर्षांपूर्वी ॲड. भु. ना. मुखर्जी, वसंत बाबू खंडेलवाल(मारोती शोरुम) केदार अग्रवाल, व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संस्था स्थापन केली होती. पन्नास वर्षाच्या प्रवासात या संस्थेने अकोलेकरांच्या मनात स्थान मिळवलं असून दरवर्षी नागरिक या प्रदर्शनी ची वाट बघत असतात. 


पहिल्याच दिवशी प्रदर्शनीला हजारो नागरिकांनी भेट देऊन प्रदर्शनीच कौतुक केलं असून, गार्डन क्लबचे ज्येष्ठ सभासद यू.टी. ठाकरे, हिरुळकर व सुषमा गायकी यांनी सुद्धा उपस्थिती दर्शविली होती. अमरावती येथून आलेल्या परीक्षकांनी उत्कृष्ट फुल व  झाडांची गटनिहाय परीक्षण करून त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना श्रेणी उपलब्ध करून दिल्या आहे. मात्र बक्षीस समारंभ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात होणार आहे. 



आयोजकांच्या वतीने अकोलेकरांना आज शेवटच्या दिवशी  प्रदर्शनी बघण्याचं आवाहन केलं जात आहे.

टिप्पण्या