election-the-akola-urban-bank: दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध



ठळक मुद्दा 

अध्यक्षपदी शंतनु जोशी तर उपाध्यक्षपदी राहुल राठी यांची अविरोध निवड

 


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेली मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,अकोलाच्या संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली असून नवनिर्वाचित संचालकांमधून बँकेच्या अध्यक्ष पदावर ज्येष्ठ संचालक शंतनु शरदचंद्र जोशी तर उपाध्यक्षपदी राहुल चंद्रकांत राठी यांची अविरोध निवड झाली आहे.

          


निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे अध्यक्षतेखाली १८ डिसेंबर २०२४ रोजी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये पार पड्लेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या सभेमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व उपजिल्हाधिकारी विजय पाटील व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के उपस्थित होते.

          

नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून: शार्दुल दिगंबर, राहुल गोयनका, शंतनु जोशी, केदार खपली, ॲड. किरण खोत, संजय कोटक, कैलाशनाथ मशानकर, दिपक मायी, ॲड. धनंजय पाटील, राहुल राठी हे संचालक अविरोध निवडून आले आहेत.

          

शाखा प्रतींनिधी मतदार संघातून: मोहन अभ्यंकर, माधव बनकर, अजय गांधी, ॲड. अमरीकसिंग वासरीकर हे संचालक अविरोध निवडून आले आहेत.

          

महिला प्रतिनिधी मतदार संघातून: सीमा डिक्कर, संगीता गांधी ह्या संचालिका अविरोध निवडून आलेल्या आहेत.

          

अनुसूचीत जाती जमाती मतदार संघातून : प्रमोद शिंदे हे अविरोध निवडून आले आहेत.

          


निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय पाटील उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) यांनी काम पहिले आहे.

टिप्पण्या