- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
court-news-akola-city-crime-: लग्नाचे आमिष देत महिलेवर अत्याचार; तुरुंगात असलेल्या आरोपीचा जामीन अर्ज मंजूर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: लग्नाचे आमिष दाखवून युवकाने अत्याचार केला असल्याची तक्रार एका महिलेने खदान पोलीस ठाण्यात नोंदविली होती. तक्रारीनंतर खदान पोलिसांनी आरोपी युवका विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. न्यायालयात जामीन याचिकेवरील सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी आरोप खोटे व निराधार असल्याचे सांगत आपली बाजू मांडली. दोन्ही पक्षाची उलटतपासणी ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
6 डिसेंबर 2024 रोजी एका महिलेने खदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की, ती पुण्यातील एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. सोशल मीडियावर तिची ओळख कोठारी वाटिका अकोला येथील रहिवासी 34 वर्षीय हर्षल याच्याशी झाली. या चर्चेदरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही एकाच समाजातील असल्याने आरोपी हर्षलने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. यानंतर
26 जून 2024 रोजी आरोपी तिला आईला भेटण्यासाठी घरी घेवून गेला. मात्र घरी कोणी नव्हते. नाश्ता केल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने बेडरूममध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला आणि लवकरच तिच्याशी लग्न करू, असे आश्वासन दिले. 6 महिन्यांपासून लग्न पुढे ढकलल्यानंतर 30 नोव्हेंबर 2024 रोजी लग्नास नकार दिला.
या तक्रारीच्या आधारे खदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376 (2) (एन) अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. कारागृहात असताना आरोपीने वकील नजीब शेख यांच्यामार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या याचिकेवरील पहिली सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्षीरसागर यांच्या न्यायालयात झाली. याचिकेच्या सुनावणी दरम्यान पीडितेच्या वकिलाने युक्तिवाद केला की, आरोपीने आपल्या अशिलाला बोलावून तिच्यावर बलात्कार केला, परंतु विवाहित असूनही त्याने याबाबत तिला माहिती दिली नाही. दरम्यान, तपास अधिकारी नीलेश करंदीकर यांनी 8 मुद्द्यांसह आरोपीला जामीन न देण्याबाबत युक्तिवाद करत जोरदार आक्षेप नोंदवला.
आरोपीच्यावतीने वकील नजीब शेख यांनी कोर्टाला सांगितले की, तक्रारदाराने केलेले आरोप बिनबुडाचे आणि त्यांचे अशिलाचे आणि तक्रारदाराचे कौटुंबिक संबंध आहेत. वकिलांनी कौटुंबिक फोटोही कोर्टात सादर केला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा