- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: प्रेयसी आणि मित्राच्या मदतीने घरफोडी करणारा आरोपी प्रेयसीसह अमरावती पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून, त्याचे कडून चोरीचे पैशातून विकत घेतलेले लॅपटॉप, गॅस सिलेन्डर व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकुण 86 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. तर आरोपी मित्र अद्यापही फरार आहे.
30 नोव्हेंबर 2024 रोजी फिर्यादी सुधा गिरीष तिवारी (वय 63 वर्ष रा. महाविर चौक परतवाडा) यांनी पो. स्टे. परतवाडा येथे येवुन तकार दिली होती कि, त्या 29 नोव्हेंबर रोजी रात्री दरम्यान त्या घरचे वरील मजल्यावर असलेल्या रुममध्ये झोपायला गेल्या असत्या खालील रुममधील कपाटातील नगदी 60 हजार रुपये तसेच एक सिलेन्डर व इतर साहित्य असे एकुण 63,950 रुपयाचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोराने कुलूप उघडुन चोरुन नेला. अशा तक्रारी वरुन पो. स्टे. परतवाडा येथे अपराध क. 870/24 कलम 305 (अ), 331 (4) भा.न्या. संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
त्यानुषगांने 10 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पथकाने मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन रोहन राजेंद्र वानखडे (रा. आझाद नगर परतवाडा) यास ताब्यात घेवुन विश्वासात घेत गुन्हयासंबंधाने पोलिसांनी विचारपुस केली. त्याने या गुन्हयाबाबत कबुली दिली. यातील आरोपी रोहन वानखडे यांlचे गणेश नगर अंजनगाव सुर्जी येथील एका युवती सोबत प्रेमसंबध असुन, ती युवती फिर्यादी सुधा तिवारी यांचे घरी वरचे मजल्यावर भाडेतत्वावर राहत होती. 29 नोव्हेंबर रोजी रात्री फिर्यादी सुधा तिवारी हया घराच्या वरील मजल्यावर झोपल्या असत्या, खाली घरात कोणीच नसल्याचे पाहुन भाडेतत्वावर राहणा-या युवतीने तिचा प्रियकर रोहन वानखडे यास फोन करुन सुधा तिवारी ही वरच्या मजल्यावर झोपली असल्याचे सांगुन तिचे घरी चोरी करण्याचा कट रचुन घराचा दरवाजा उघडा ठेवला. त्याप्रमाणे रोहन वानखडे याने त्याचा साथीदार प्रणय रघुनाथ बादशे (रा. खिरणी बगीचा, परतवाडा) यास स्वताचे मोटर सायकलवर बसुन सुधा तिवारी यांचे घरुन सिलेन्डर व इतर सामान चोरुन आणले.
आरोपी रोहन वानखडे व त्याची प्रियकर यांना ताब्यात घेवुन चोरलेल्या मुददेमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि, चोरलेल्या पैसेतुन HP कंपनीचे लॅपटॉप खरेदी केले असुन सिलेन्डर रोहन वानखडे याचे घरी ठेवले आहे. आरोपींताकडुन चोरीचे पैसतुन विकत घेतलेले एक HP कंपनीचे लॅपटॉप, एक HP कंपनीचे गॅस सिलेन्डर व गुन्हयात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटर सायकल असा एकुण 86 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पो. स्टे. परतवाडा करीत आहे.
ही कार्यवाही विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा, पंकज कुमावत, अप्पर पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक संजय प्रधान महिला पोलिस अंमलदार राखी गवई पो स्टे परतवाडा, सायबर विभागाचे शिवा सिरसाट यांनी केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा