- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
big-action-by-team-LCB-akola: वर्षाच्या शेवटच्या दिवशी एलसीबीची मोठी कारवाई; शास्त्री नगर भागातून 10 किलो गांजा जप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथका कडुन धाड टाकून पोलीस स्टेशन सिव्हील लाईन हद्दीतील शास्त्री नगर भागातून एका इसमाकडुन अंदाजे अडीच लाख किमंतीचा 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. वर्षांच्या शेवटच्या दिवशी एलसीबीने ही मोठी कारवाई केली आहे.
आज 31 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन सिव्हील लाईन अकोला हद्दीतील शास्त्री नगर भागात एक इसम मोठया प्रमाणात गांजा विक्री करिता बाळगुन आहे. अशा माहितीवरून धाड टाकून आरोपी दिलशाद खाँ हसीब खाँ, (वय 33 वर्ष, रा. ग्राम डोरीया पोस्ट चन्नी ता. बायसी जि. पुर्णिया राज्य बिहार ह.मु. चारूलता काळे मेमोरियल आय.एम.ओ. हॉल चे समोर अकोला) हा अंमलीपदार्थ गांजा स्वतः जवळ बाळगतांना मिळुन आला. आरोपी जवळुन एकुण 10 किलो 22 ग्रॅम गांजा किंमत अंदाजे 2,55,500/ रूपयेचा जप्त करण्यात आला.
यावरून आरोपी विरूध्द एन.डी.पी.एस. ॲक्ट अन्वये कारवाई करून आरोपीस पुढील कारवाई कामी पो.स्टे. सिव्हील लाईन अकोला यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह,अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला सहायक पोलीस निरिक्षक विजय चव्हाण, पोलीस उप निरिक्षक गोपाल जाधव, पोलिस उप निरीक्षक माजीद पठाण स्थानिक गुन्हे शाखा अकोला व पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, राजपालसिंह ठाकुर, गणेश पांडे, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, गोकुळ चव्हाण, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, वसिमोद्दीन, प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे, अन्सार अहमद, स्वप्निल खेडकर, आकाश मानकर, अभिषेक पाठक, भिमराव दिपके यांनी केली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा