balapur-constituency-election: कृष्णा अंधारे यांच्या फसवणुकीला कोणीही बळी पडू नये- तुकाराम अंभोरे पाटील यांचे आवाहन




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : विधानसभा निवडणुकीत बाळापुर मतदार संघात महायुतीचा उमेदवार असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी नामांकन अर्ज भरून ही निवडणूक लढली होती. यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आहे. यामुळे कृष्णा अंधारे यांना 8 नोव्हेंबरला प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षातून निष्कासित केलं होत. मात्र अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे यासाठी कृष्णा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची छापी गळ्यात घालून अकोल्याचे ग्रामदेवता श्रीराज राजेश्वराला दुग्धाअभिषेक केला होता. कृष्णा अंधारे यांच्या या कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांनी एक पत्र काढले आहे. यामध्ये कृष्णा अंधारे हे स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष भासवून लोकांची फसवणूक करत असल्याच उल्लेख करण्यात आला आहे. तर कृष्णा अंधारे यांच्या या फसवणुकीला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन देखील या पत्राद्वारे अंभोरे यांनी केले आहे.




राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झालेले कृष्णा अंधारे यांनी अकोल्याचे आराध्य दैवत राजेश्वर महाराज येथील मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन तेथे राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह वापरून घोषणाबाजी केली ही बाब अतिशय निंदनीय असून, यापूर्वी येथे अनेक मोठे राजकीय नेते येऊन गेले. परंतु अशी घटना घडलेली नाही. कृष्णा अंधारे यांनी केलेल्या या राजकीय वापराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून, सर्व राजराजेश्वर भक्तांची जाहीर माफी मागण्यात आली.




यावेळी ओबीसी महानगराध्यक्ष अनिल मालगे यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी महानगरपालिका माजी गटनेते मनोज गायकवाड, माजी नगरसेवक दिलीप देशमुख, गौतम गवई, युवक महानगर अध्यक्ष अजय मते, विद्यार्थी महानगराध्यक्ष वैभव घुगे, महानगर प्रसिद्धी प्रमुख बुढन गाडेकर, महानगर महासचिव संतोष डाबेराव, अशोक परळीकर,आकाश इंगळे, यश सावल, प्रकाश खंडारे आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या