- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आपल्या मालकाचे ट्रॅक्टर चालवीत काम करीत असताना झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ट्रॅक्टर चालकाच्या कुटुंबियांना व्याजा सकट नुकसान भरपाई देण्याचा आदेश कामगार न्यायालयाने नुकताच दिला.
अकोट तालुक्यातील बोचरा गावातील युवा मजूर पुरुषोत्तम डामरे हे बेलखेड येथील कास्तकार विठ्ठल वानखडे यांच्या ट्रॅक्टरवर कामाला होते. ट्रॅक्टरवर काम करीत असताना त्यांचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला. डामरे कुटुंबीया कडून ॲड. मो.इलयास शेखानी यांनी प्रकरण दाखल केले. मयत डामरे यांना कास्तकार वानखडे व ट्रॅक्टरची जनरल इन्शुरन्स बजाज अलियान्झ या विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, यासाठी मयत डामरे यांच्या कुटुंबीयांनी 6 सप्टेंबर 2021 रोजी कामगार न्यायालय अकोला येथे नुकसान भरपाई साठी दावा दाखल केला.
या संदर्भात कामगार न्यायालयाने मृतकाचे कामावरील वय, पगार आदी बाबींची शहानिशा व गैर अर्जदाराचे बयाण व वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन मृतक ट्रॅक्टर चालक पुरुषोत्तम डामरे यांच्या कुटुंबियांना 6 सप्टेंबर 2021 पासून वार्षिक 9 टक्के व्याज सहित नुकसान भरपाई म्हणून 8 लाख 79 हजार 800 रुपये मालक यांनी दयावे, असे आदेश बजावलेत.
मयत डामरे कुटुंबीया कडून ॲड. मो. इलयास शेखानी यांनी न्यायालयीन कामकाज बघितले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा