tushar-pundkar-murder-case: प्रहार संघटनेचे नेते तुषार पुंडकर खून खटल्यामध्ये सुनावणीला सुरवात; अकोट न्यायालयात फिर्यादीची साक्ष, पुढील सुनावणी 9 डिसेंबर रोजी




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोट येथील प्रहार संघटनेचे नेते तुषार पुंडकर खून खटल्यामध्ये सुनावणीला सुरवात झाली असून, आज अकोट न्यायालयात फिर्यादीची साक्ष घेण्यात आली. या प्रकरणात पुढील सुनावणी 9 डिसेंबर रोजी होणार आहे.



अकोट येथे आज 30 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश  बी. एम. पाटील यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनचे फाईल वरील अप. क्र. 80/2020 भादंविचे कलम 302,120ब, 201,34 सहकलम 3/25,5/27, 7/27 आर्म ॲक्ट या गुन्हयातील मृतक प्रहार संघटनेचे नेते तुषार पुंडकर गोळीबार हत्याकांड खटल्याच्या सुनावणी13  नोव्हेंबर rohi या प्रकरणातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल भाष्कर शालीग्राम सांगळे,  (रा. पोलीस लाईन अकोट शहर) याची साक्षी पुरावा नोंदविण्यात आला आहे. तसेच आज  30 नोव्हेंबर रोजी इतर साक्षीदारांच्या साक्ष नोंदणी करीता  9 डिसेंबर तारीख निश्चित करण्यात आली आहे.


या प्रकरणात आरोपी पवन शेदानी, अल्पेश दुधे, श्याम नाठे, गुजन चिंचोळे, ( रा. अकोट, ), निखील शेदानी (रा. इंदोर मध्येप्रदेश), शुभम जाट (रा. फिफरिया जिल्हा खरगोन, मध्यप्रदेश), शहाबाज खान, (शेंदवा, जि. बडवाणी मध्यप्रदेश) या सर्व आरोपींनी कट कारस्थान करून  21 फेब्रुवारी 2020 चे रात्री 10 वाजताचे सुमारास तुषार फुडकर यांच्यावर गावठी पिस्तोल मधुन गोळी झाडून त्यांना ठार मारले. अशी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल भाष्कर सांगळे यांनी दिल्यावरून वरील सर्व आरोपीं विरूध्द तपास करून विविध कलमा अंतर्गत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सात आरोपींन पैकी श्याम नाठे, राहणार अकोट हा आरोपी अजुनही कारागृहामध्ये बंदीस्थ आहे. 


या प्रकरणात विद्यमान मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांनी सदरचा खटला जुन 2025 पर्यंत निकाली काढावा अशे आदेश दिले आहे. त्यामुळे प्रकरणात विशेष सरकारी वकील विनोद फाटे यांचे मार्गदर्शनाखाली सरकारी वकील अजित देशमुख यांनी या खटल्यामध्ये सरकार तर्फे एकुण 27 साक्षीदारांची यादी दाखल केली असून त्यापैकी या प्रकरणातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल भाष्कर शालीग्राम सांगळे  यांची साक्ष  13 नोव्हेंबर रोजी

नोंदविण्यात आली. व त्यामध्ये आज  30 नोव्हेंबर रोजी सरकारी वकील अजित देशमुख यांनी विशेष सरकारी वकील विनोद फाटे यांच्यातर्फे घटनास्थळपंच म्हणुन दिनेश प्रल्हादराव मोहकार व शैलेश विजयराव मेतकर या साक्षीदारांच्या नावे समन्स काढण्याची विनंती केली. त्यानुसार  खटल्यामध्ये साक्ष नोंदविण्या करीता 09 डिसेंबर ही तारीख ठेवण्यात आली आहे. या साक्षीदारांची साक्ष संपल्यानंतर पुन्हा नवीन साक्षीदारांची यादी देण्यात येणार आहे. 


या प्रकरणात आज रोजी न्यायलयाने या प्रकरणातील घटनास्थळ पंच दिनेश मोहकार व शैलेश मेतकर यांच्या नावाने साक्ष समन्सचा आदेश जारी करून साक्षीकरीता 9 डिसेंबर रोजी साक्षी करीता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 


 


टिप्पण्या